न्यूयॉर्क - आयफोन-६
मोबाइल लवकरच ९ सप्टेंबरला लाँच होणार आहे आणि तो खरेदी करण्यासाठी लोकांनी अक्षरश: लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. आयफोन विकत घेण्यासाठी रांगेत सर्वात समोर उभा असलेल्या जोसेफ क्रुझला त्याची जागा सोडण्यासाठी ७५ हजार रुपये (१२५० डॉलर्स) मिळाले आहे. आता तो या रांगेत तिसऱ्या स्थानावर आला असून जर पैसे मिळत असेल तर ही जागासुद्धा सोडायला तयार आहे. न्यूयॉर्कच्या ५-अव्हेन्यूस्थित परिसरात लोक बऱ्याच दिवस आधीपासूनच तंबू टाकून राहायला आले आहेत.
न्यूयॉर्कमधील मीडियानुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेतील अनेक शहरांतून लोक येथे दाखल झाले होते. आयफोन -६ चे प्रस्तावित लाँचिंग ९ सप्टेंबरला झाल्यानंतर या स्टोअरमध्ये आयफोन - ६ ची १९ तारखेपासून येथे विक्री सुरू होईल, असे म्हटले जात आहे. अर्थात कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
पुढे वाचा, सर्जरी करून हातावर बसवली चिप