आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iphone Lookalike Lenovo S90 Launched In India Costing Rs 19990

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Lenovo चा iphone 6 सारखा दिसणारा S90 स्मार्टफोन लॉन्च, 8MP फ्रन्ट कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - चीनमध्ये कोणत्याही बड्या इव्हेंटशिवाय लो प्रोफाईल स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर जगप्रसिध्द हार्डवेअर कंपनी लिनोवोने आयफोन 6 सारखा दिसणारा लेनोवो सिसली S90 आता भारतात लॉन्च केला आहे. या फोनची लॉन्चिंग भारतीय मार्केटमध्ये कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाशिवाय करण्यात आली. आयफोनप्रमाणे दिसणार्‍या या फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे सेल्फी आणि व्हिडीओ कॉल शौकिनांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

कोठून मिळाली माहिती आणि किंमत -
लिनोवो सिसली S90 च्या लॉन्चिंगबद्दलची माहिती मुंबईतील रिटेलर मनीश खत्री (@maheshtelecom) यांनी दिली. रिटेलरने दिलेल्या माहितीनुसार या फोनचा लूक आयफोन 6 प्रमाणे आहे. तर या फोनची किंमत 19990 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र लिनोवोने या फोनला अजून लिनोवो इंडियाच्या वेबसाईटवर अपलोड केले नाही. तसेच ईकॉमर्स वेबसाईटवरसुध्दा हा फोन अजूनपर्यंत लिस्ट झालेला नाही. मात्र रिटेलर्सकडे या फोनचा स्टॉक येण्यास सुरूवात झाली आहे.

लिनोवोने हा फोन नोव्हेंबर महिन्यात चिनमध्ये लॉन्च केला होता. चीनी मार्केटमध्ये या फोनची किंमत CYN 1999 (जवळपास 20000 रुपये) एवढी ठेवण्यात आली होती. या फोनला आयफोनचाच क्लोन मानण्यात येत आहे. या फोनचे वेबपेजपासून ते प्रमोशनल फोटोजपर्यंत सर्व काही आईफोन 6 प्रमाणेच दिसत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या फोनचे फीचर्स...