आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iphone To Launch New Iphone Models In India On November 1

अ‍ॅपलकडून दिवाळीची भेट, आयफोनचे नवे मॉडेल्‍स भारतात 1 नोव्‍हेंबरला होणार लॉंच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅपल भारतातील गॅजेटप्रेमींना भेट देणार आहे. अ‍ॅपलने गेल्‍या महिन्‍यात लॉंच केलेले स्‍वस्‍त iPhone 5C आणि iPhone 5S हे स्‍मार्टफोन्‍स 1 नोव्‍हेंबरला भारतात सादर करण्‍यात येणार आहेत. नव्‍या आयफोन्‍सबाबत भारतात प्रचंड उत्‍सुकता होती. त्‍यामुळे गॅजेटप्रेमींसाठी ही दिवाळीची भेट ठरणार आहे.

अ‍ॅपलने 10 सप्‍टेंबरला आयफोनचे दोन मॉडेल्‍स एकाच वेळी लॉंच केले होते. अमेरिकेसह चीन, ब्रिटन, ऑस्‍ट्रेलिया, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, हॉंगकॉंग, जपान आणि सिंगापूरमध्‍ये नवे आयफोन्‍स विक्रीसाठी उपलब्‍ध करण्‍यात आले होते. भारतात दोन्‍ही मॉडेल्‍सबाबत उत्‍सुकता होती. दिवाळीचे निमित्त साधून अ‍ॅपलने भारतात लॉंच करण्‍याचे ठरविले आहे. भारतासोबतच 15 देशांमध्‍ये 1 नोव्‍हेंबरला फोन लॉंच होणार आहे. त्‍यापूर्वी 25 ऑक्‍टोबरला 25 देशांमध्‍ये नवे आयफोन्‍स लॉंच होतील. अ‍ॅपलने दोन स्‍वस्‍त फोन लॉंच करताना प्रथमच इतर रंगात हॅण्‍डसेट उपलब्‍ध केले होते. त्‍यापैकी iPhone 5C हा फोन ब्लू, ग्रीन, यल्लो आणि व्हाईट अशा रंगात उपलब्ध असेल तर iPhone 5S हा फोन गोल्ड, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे अशा रंगांमध्‍ये उपलब्ध होणार आहे.

अमेरिकेत कॉन्ट्रॅक्ट फ्री अनलॉक्ड iPhone 5C च्या 16GB मेमरी मॉडेलची किंमत 549 डॉलर्स (सुमारे 34700 रुपये) आणि iPhone 5S ची किंमत 649 डॉलर्स (सुमारे 41000 रुपये) आहे. भारतातील किंमतीबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. त्‍यामुळे आता या स्‍वस्‍त आयफोन्‍सच्‍या किंमतीबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.