Home | Business | Gadget | ipo, lounch at monday

सोमवारी उघडणार दोन कंपन्यांचे आयपीओ

प्रतिनिधी | Update - Jun 19, 2011, 04:10 AM IST

बाजारात सध्या घसरणीचा कल असतानाही बिर्ला पॅसिफिक मेडस्पा लिमिटेड आणि रुशील डेकॉर लिमिटेड या दोन कंपन्यांनी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचे धाडस दाखवले आहे.

  • ipo, lounch at monday

    मुंबई: बाजारात सध्या घसरणीचा कल असतानाही बिर्ला पॅसिफिक मेडस्पा लिमिटेड आणि रुशील डेकॉर लिमिटेड या दोन कंपन्यांनी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचे धाडस दाखवले आहे. या दोन्ही कंपन्यांची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) सोमवारपासून सुरू होत आहे.
    यश बिर्ला समूहातील बिर्ला पॅसिफिक मेडस्पा लिमिटेड ही कंपनी प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे समभाग आणत असून त्यासाठी प्रती समभाग १० ते ११ रुपये दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या प्राथमिक समभाग विक्रीतून ६५.१७ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा कंपनीचा विचार आहे.
    डेकोरेटिव्ह लॅमिनेटेड शीट्स आणि प्लेन पार्टिकल बोर्डचे उत्पादन करण्यात आघाडीवर असलेली गुजरातमधील रुशील डेकॉर लिमिटेड ही कंपनी आपल्या नवीन प्रकल्पाला भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी प्राथमिक समभाग विक्रीतून निधी उभारण्याचा विचार करीत आहे. कंपनीचे गुजरातमध्ये चार अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत.
    कंपनी प्रत्येकी १० रुपये मूल्याचे ५६ लाख ४३ हजार ७५० समभाग विक्रीला आणत आहे. या समभाग विक्रीसाठी ६३ रुपये ते ७२ रुपये दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किमान किमतीला ३५ कोटी रुपये आणि कमाल किमतीला ४० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. या समभाग विक्रीसाठी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजिक अलायन्झ लिमिटेड आणि इंडसइंड बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही बुक रनिंग लिड मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. या दोन्ही कंपन्यांची समभाग विक्री २३ जून रोजी बंद होणार आहे.

Trending