Home | Business | Industries | iras international film company, profit increased, business

इरॉसचा निव्वळ नफा ४३ टक्क्यांनी वाढला

agency | Update - Jun 01, 2011, 02:15 PM IST

चित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे.

  • iras international film company, profit increased, business

    नवी दिल्ली -चित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वित्तीय वर्षात कंपनीचा निव्वळ नफा ८२.१ कोटी रुपये राहिला होता. वित्तीय वर्ष २१-११ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्नदेखील ९.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ७१६ कोटींवर गेले आहे. मागील वर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न ६५३.५ कोटी रुपये होते. सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापन, चित्रपटांच्या वितरणासाठी सर्वोत्तम नियोजन तसेच जाळ्याचा विस्तार केल्याने २१-११ मध्ये कंपनीने चांगली कामगिरी केली आहे, असे कंपनीचे संचालक सुनील लुला यांनी म्हटले आहे.
    ...................................

Trending