आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irctc Launched New Mobile App Connect For Reservation

IRCTC ने लॉन्च केले App, आता मोबाइलवरूनच रेल्वे तिकिट रिझर्व्हेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IRCTC ने आता अँड्रॉइड युजर्ससाठीही नवे तिकिट रिझर्व्हेशन App लॉन्च केले आहे. यापूर्वी IRCTC ने 'ब्लॅकबेरी 10'साठी तिकिट रिझर्व्हेशन App लॉन्च केले होते. IRCTC ने आपले App गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. युजर्सला हे App येथून मोफत डाउनलोड करता येईल.

IRCTC च्या Appचे साइज 12 MB असून अँड्रॉइड 4.1 अथवा त्यापेक्षा वरील ऑपरेटिंग सिस्टमवर डाउनलोड करता येईल. गुगल प्लेवरील लिस्टिंगनुसार, नव्या Appवरून रेल्वे तिकिट, रिझर्व्हेशन, ट्रेन शेड्यूल, ट्रेन रूटविषयी माहिती सहज उपलब्ध होईल.

मात्र, IRCTC ने या Appच्या वापरावर काही निर्बंधही घातली आहेत. सकाळी 8 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत हे App वापरावर बंदी घातली आहे. तत्काळ तिकिट बुकिंग करणार्‍या यूजर्ससाठी मोबाइल सर्व्हरवर भार पडणार नाही, यासाठी ही उपाययोजना केली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रेल्वेशी संबंधित अन्य App विषयी...