आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IRCTC ने लॉन्च केले नवे मोबाइल App, अवघ्या दोन मिनिटांत बुक करता येईल तिकिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्‍ड टूरिझम कॉरपोरेशनने (IRCTC) नवे मोबाइल अॅप्स लॉन्च केले आहेत. प्रवाशांना आता अवघ्या दोन मिनिटांत आपले प्रवास तिकिट बुक करता येणार आहे. याशिवाय प्रवासादरम्यान सीटवर बसूनच फोनवरून जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
IRCTC ची तिकिट बुकिंग वेबसाइट वारंवार 'स्लो' होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे IRCTC ने अँड्रॉइड युजर्ससाठी नवे तिकिट रिझर्व्हेशन App लॉन्च केले आहे. 'IRCTC CONNECT' असे अॅपचे नाव आहे. आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करता येते.
इंडियन रेल्वेच्या या ऑफिशियल मोबाइल बुकिंग अॅप 'IRCTC CONNECT' ची डाऊनलोड करणार्‍यांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. या अॅपचा स्पीड इतका आहे की, युजर अवघ्या दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये आपले तिकिट बुक करू शकतात. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे वेबसाइटप्रमाणे हे हँग होत नाही. तसेच सर्व्हर डाऊनची देखील समस्या येत नाही. 'ट्रायल फेज'मध्ये असल्याने सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान प्रवाशांना तिक‍िट बुक करता येणार नाही. मात्र, लवकरच प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.
अॅपचे फीचर्स...
- नव्या युजरचे डायरेक्ट रजिस्ट्रेशन
- 'वन स्टेप लॉग इन'मुळे वारंवार लॉग इन होण्याची आवश्यकता नाही.
- ट्रेन आणि सीट सर्च व तात्काळ तिकिट बुकिंग
- बुक झालेले तिकिट कॅन्सलेशनची सुविधा
- अपकमिंग जर्नी अलर्ट

पुढील स्लाइडवर क्लिक करून रेल्वे गाड्यांमध्ये लवकरच सुरु होईल 'ई-केटरिंग' सुविधा...