आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irda Asks National Insurance To Adhere To Claims Servicing Rules

एक एप्रिलपासून वाहन विमा प्रीमियम महागण्याचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इर्डाने वाहनांच्या विमा हप्त्यांमध्ये वाढ केली आहे. विमा प्रीमियमचे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. इर्डाने या प्रीमियम दरात वाढ करण्याचे आदेश सर्वच विमा कंपन्यांना या आठवड्यात दिले. नव्या आदेशानुसार इन्शुरन्स रिन्युअल आणि नवीन इन्शुरन्स करणार्‍या वाहनमालकांना दुप्पट पैसे मोजावे लागतील. प्रीमियम दरवाढीचा सर्वात परिणाम लक्झरीज कार, महागड्या गाड्यांवर होणार आहे.

350 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या टू व्हीलरवर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम भरताना 108 टक्के अधिक पैसे भरावे लागतील. भारी-आलिशान वाहनांच्या प्रीमियमवर दीडपट अधिक रक्कम मोजावी लागेल. इन्शुरन्स कंपन्यांचा वाढता ताटा आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता इर्डाकडून प्रीमियम वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कंपन्यांचा इंडेक्स आणि नुकसान भरपाईसाठी थर्डपार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवला आहे. वाहनचालकांना 12.36 टक्के सवर््िहस टॅक्स द्यावा लागणार आहे. 1 एप्रिलनंतर जे वाहनचालक इन्शुरन्स रिन्युअल करतील, त्यांना नवीन दरानुसार प्रीमियम भरावा लागेल.

आठवडाभरात आदेश
वाहनांचा प्रकार आणि त्या प्रकारात होणारे अपघातांचे प्रमाण या गोष्टी प्रीमियममध्ये विचारात घेतल्या जातात. त्यामुळे काही प्रीमियम दुप्पट वाढतील, तर काहींमध्ये फारसी वाढ होणार नाही. अद्याप अधिकृत आदेश आले नाहीत. शेवटच्या आठवड्यात याबाबत आदेश येण्याची शक्यता आहे. अनिल निंबाजी, विकास अधिकारी, युनायटेड इन्शुरन्स, जळगाव.