आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irda Introduces New Category For Minimum Death Benefit

डेथ बेनिफिटमध्ये होणार कपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लघु मुदतीच्या आयुर्विमा पॉलिसींवर ग्राहकांना आता अल्प डेथ बेनिफिट मिळणार आहे. पाच वर्षे ते नऊ वर्षे मुदतीच्या आयुर्विमा पॉलिसीवर किमान डेथ बेनिफिट पाचपट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यावर पॉलिसीधारकाला कर कपातीचा लाभ मिळणार नाही. विमा नियंत्रक व नियामकाने (आयआरडीए-इर्डा) आयुर्विमा उत्पादनांबाबत नवे मापदंड जारी केले. त्यात हे बदल करण्यात आले आहेत.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचे उपाध्यक्ष संजय तिवारी यांनी सांगितले, इर्डाने एका पत्रकाद्वारे आयुर्विमा उत्पादनासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे कळवली आहेत. अशा पॉलिसींवर ग्राहकांना कर बचतीचा लाभ मिळणार नाही. किमान डेथ बेनिफिटबाबत यात नवे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार 45 वर्षांपर्यंतच्या ग्राहकांना 10 पट किमान डेथ बेनिफिट, तर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांसाठी 7 पट किमान डेथ बेनिफिट कायम ठेवण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.

दहापट बेनिफिट देणे अशक्य
लघु मुदतीच्या विमा पॉलिसींवर 10 पट किमान डेथ बेनिफिट देणे अशक्य असल्याचे मत आयुर्विमा कंपन्यांनी व्यक्त केले. यामुळे खर्चात वाढ होईल, असे कंपन्यांना वाटते. इर्डाने कंपन्यांची ही अडचण लक्षात घेऊन अशा पॉलिसींसाठी सम अश्युर्डबाबत कंपन्यांना दिलासा दिला आहे. पेन्शन प्लॅनसाठीही इर्डाने ही नवी तरतूद लागू केली आहे. या तरतुदीनुसार व्यक्तिगत सेगमेंटच्या पेन्शन योजनांत प्रीमियमच्या 105 पट डेथ बेनिफिट मिळणार आहे.

नेमका परिणाम काय
5 ते 9 वर्षे मुदतीच्या आयुर्विमा पॉलिसीवर किमान डेथ बेनिफिट पाचपट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यावर पॉलिसीधारकाला कर कपातीचा लाभ मिळणार नाही.

नवीन उत्पादने
कंपन्यांना एक ऑक्टोबरपर्यंत इर्डाच्या नव्या निर्देशानुरूप आयुर्विमा विमा उत्पादने बाजारात आणावी लागणार आहेत.