आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irda Suggests New Things In Insurance Bill, Divya Marathi

विमा विधेयकासाठी विमा नियामकाच्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरोग्य विमा, कॉमर्ससारख्या वेगळ्या क्षेत्रांना प्रस्तावित विमा विधेयकात समाविष्ट करण्यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा ) काही सूचना मागवल्या असल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष टी.एस. विजयन यांनी सांगितले. आमच्याकडे अनेक सूचना आल्या असून त्या संसदेच्या निवड समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. हे विधेयक २००६ च्या सुमारास तयार करण्यात आले आणि तेव्हापासून त्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत.

२०१४ मधील विमा विधेयक आणण्यात येणार आहे, तेव्हा तंत्रज्ञानात अलीकडे झालेल्या बदलांचा समावेश करणे चांगले ठरेल आणि तेही विधेयकात येईल, असे विजयन यांनी स्पष्ट केले. असोचेमने आयोजित केलेल्या एका परिषदेत ते बोलत होते.

केंद्रात आलेल्या एनडीए सरकारने अलीकडे झालेल्या संसदेच्या सत्रांमध्ये विमा विधेयकाला ताजे रूप दिले आहे. हे विधेयक संमत झालेले नसून ते निवड समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे विजयन यांनी सांगितले.