आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irregular Business Banks Facing Action ; Signaling Reserve Bank

मनी लॉर्ड्रिंगमध्‍ये सहभागी बँकांवर होणार कारवाई ; रिझर्व्‍ह बँकेचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काही बड्या खासगी बॅँकांचा मनी लॉड्रिंग प्रकरणाचा कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने पर्दाफाश केल्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने या बॅँकांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली होती. ही चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून बॅँकांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात दोषी ठरणा-या बॅँकांच्या विरोधात लवकरच कडक कारवाई करण्याचे संकेत रिझर्व्ह बॅँकेने दिले आहेत.


या बॅँकांची चौकशी पूर्ण झाली असून त्याबाबतचा अंगर्तग अहवाल तयार करण्यात आला आहे. पण चौकशी करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे. बॅँकांच्या नियमांशी बांधिल न राहता गैरव्यवहारात सहभागी असलेल्या वैयक्तिक संस्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी सांगितले. मध्यवर्ती बॅँकेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


बॅँकिंगविषयक नियमांचे उल्लंघन करणा-या बॅँकांवर दंडात्मक कारवाई करण्याअगोदर काही ठराविक प्रक्रियेच्या मार्गाने जावे लागणार आहे. त्यामुळे या बॅँकांच्या कारवाईचा नेमका कालावधी सांगता येणार नाही असेही सुब्बराव यांनी स्पष्ट केले. चौकशी च्या दरम्यान आढळून आलेल्या काही त्रूटी दूर करण्यासाठी सुनियोजित कारवाईच्या माध्यमातून पुढाकारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या 15 कर्मचारी सदस्यांना बडतर्फ करण्यासह 31 कर्मचा-यांच्या विरोधात अगोदरच कारवाई केली आहे. चौकशी प्रक्रिया अजुनही चालू असून काही खासगी बॅँकांनी देखील आपल्या कर्मचा-यांच्या विरोधात कार्यवाही केली आहे.


काय होते प्रकरण
सोमवारी ऑनलाइन वेबपोर्टल ‘कोब्रापोस्ट’ने सोमवारी केलेल्या दाव्यात देशभरातील 23 वित्तीय संस्था काळा पैसा पांढरा करण्याच्या गोरखधंद्यात गुंतलेल्या असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यासाठी आरबीआयच्या केवायसी नियमांना धाब्यावर बसवण्यात आल्याच आरोप करण्यात आला होता. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, ओबीसी, डीसीबी, धनलक्ष्मी बँक, आयडीबीआय बँक, यस बँक, फेडरल बँक, एलआयसी, रिलायन्स कॅपिटल, इंडियन बँक, टाटा एआयजी, बिर्ला सनलाइफ आदी दिग्गज बँका आणि वित्तीय संस्थांचे नाव घेतले होते.