आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Is Iphone's Find My Phone Feature Responsible For Celebs Account Hacking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, iPhone च्या या अ‍ॅपमुळे लिक झाले 101 सेलिब्रिटींची विवस्त्र छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जेनिफर लॉरेंस आणि फाइंड माय फोन फीचर)
गॅजेट डेस्क - हॉलीवुडच्या 100 पेक्षा जास्त अभिनेत्री, गायिका आणि सेलिब्रेटीजचे फोन हॅकींगचा प्रकार नुकताच घडला. यातून त्या सेलिब्रेटीजचे फोटो न्यूड फोटो हॅक करून ते सोशल नेटवर्कींगवर टाकण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त फोटो अभिनेत्री जेनिफर लॉरेंन्सचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या अभिनेत्रीचे 60 फोटो लिक झाले आहेत. आतापर्यंत सेलिब्रेटीजशी संबंधीत ही सर्वात मोठी घटना आहे. विशेष म्हणजे मिळालेल्या वृत्तानुसार ह्या सेलेब्रिटीच्या आयफोनमधून हे फोटो लिक झाले आहेत.

अ‍ॅपलकडून आले स्पष्टीकरण
अ‍ॅपलने केलेल्या तपासात हे फोटो कंपनीच्या 'Find My iPhone' (लोकेटर अ‍ॅप) या अ‍ॅपमधून लिक झाले आहेत. हे फीचर आयक्लाऊड सर्व्हिसच्या माध्यमातून युजरच्या फोनला एखाद्या दूरच्या ठिकाणावर लोकेट करू शकते. हॅकींगच्या 24 तासांनंतर रविवारी अ‍ॅपलने म्हटले की, ही हॅकींग कशी झाली याबद्दल कंपनीला काहीच माहिती नाही. मात्र आय क्लाऊडमुळे ही हॅकींग झाली की नाही, याबद्दल कंपनी तपास करत आहे. अ‍ॅपलच्या मते कंपनी युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल खुपच सजग आणि आणि फाईंड माय फोन या फीचरचाही तपास सुरू आहे.

कसे काम करते iCloud
iCloud एकदा अ‍ॅक्टीव्हेट झाल्यानंतर युजर्सचे फोटो, ईमेल, कॉन्टॅक्ट आणि इतर माहिती सिंक्रोनाईजकरून इंटरनेटवर सेव्ह करते. ही माहिती युजर्सचा आयडी आणि पासवर्डच्या साह्याने कोणत्याही कॉम्प्यूटरवरून मिळवता येऊ शकते. अ‍ॅपलचा फाईंड माय फोन फीचर हे आयक्लाऊड सर्व्हिच्या साह्याने काम करते. हे फीचर आयफोनच्या कोणत्याही जागेवरून रिमोटली लोकेट करू शकते. ऑक्टोबर 2011 मध्ये लॉन्च झालेल्या ही सर्व्हीस जगभरातील जवळपास 320 मिलियन यूजर्स वापरतात. इंटरनेटवर सेव्ह करण्याआगोदर आयक्लाऊड युजर्सचा डाटा एन्क्रीप्ट करतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, अ‍ॅपलने यावर काय काढला उपाय