आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेटपासून सुरु झाली ही कंपनी; आज प्रत्येक घरात आढळतात \'आयटीसी\'चे प्रॉडक्ट्‍स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- सुरुवातीला सिगारेटची निर्मिती करणारी कंपनी, अशी ओळख असलेल्या 'आयटीसी'ने गेल्या दशकात कंझ्युमर प्रॉडक्‍ट बाजारात आपला दबदबा निर्माण केला आहे. कंपनीने 2003 मध्ये एफएमसीजी सेगमेंटमध्ये यशस्वी पर्दापण केले. अवघ्या 10 वर्षांच्या काळात आयटीसीची उलाढाल 10,000 कोटी रुपयांची घरात पोहोचली आहे.

इम्‍पीरियल टोबेको कंपनीची (आयटीसी) 1910 मध्ये स्‍थापना झाली होती. सुरुवातील सिगारेट हे या कंपनीचे प्रमुख उत्पादन होते. मात्र, तंबाखुजन्य पदार्थ उद्योगात मोठी मंदी आल्याने आयटीसीने कंझ्युमर आणि खाद्य उत्पादनांच्या निर्मितीवर अधिक भर दिला. सध्या कंपनीच्या नफ्यात वर्षीला 16 टक्क्यांने होत आहे.
जवळपास 100 वर्षांपूर्वी आयटीसीची स्थापना झाली होती. आज कंपनीचे उत्पादने कोट्यवधी लोकांच्या दैनदिन जगण्याचा भाग झाला. सिगारेट निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेल्या आयटीसीने आपल्या बळावर देशात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यशाच्या उंबरठ्यावर...
=> कंपनीचे स्ट्रक्चर इनीशिएटिव्ह हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून वापरले जाते.
=> नफ्याच्या बाबत सांगायचे तर खासगी क्षेत्रात आयटीसीने पहिल्या पाच कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
=> जगातील दिग्गज 10 एफएमसीजी कंपन्यांच्या यादीत आयटीसीच्याही नावाचा उल्लेख होतो.
=> डाइव्हर्सिफिकेशन आयडियावर काम करण्यासाठी 55 लोकांची रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीम.

भारतातील बहुतांश लोक आयटीसी लिमिटेडचे उत्पादन वापरतात. फूड, पर्सनल केअर, ब्रांडेड अपेरल, सिगारेट, हॉटेल, अॅग्री-बिझनेस या क्षेत्रातील कोणत्याही उत्पादनाची निर्मिती आयटीसी कंपनी करते. आयटीसी लिमिटेडच्या डिक्शनरीमध्ये 'फुल स्टॉप' सारख्या शब्द नाही.
यामुळे 18 सप्टेंबर 2001मध्या कंपनीच्या नावातील सगळे 'फुल स्टॉप' काढून टाकण्यात आले होते. 24 ऑगस्ट 1910 मध्ये तंबाखु कंपनीच्या रुपात सुरु झालेली कंपनी आज देशातील सगळ्यात मोदी डायव्हर्सिफाइड कंपनीच्या रुपात ओळखली जाते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आयटीसी कंपनीच्या यशोगाथाबाबत...