आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग्वारची पहिली कॉम्पॅक्ट कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जग्वारची नवी टू-सीटर एफ-टाइप ‘परफेक्ट’ स्पोर्ट्स कार आहे. गाडीच्या हुडवर पॉवर बल्ज आहे. लाइटमुळे शार्प लूक येत आहे. शार्क ग्रिल असलेली ही पहिली जग्वार कार आहे. मागील व्ह्यूमध्ये बदल दिसून येईल. त्यात स्लिम टेल-लाइट आणि राउंड कट-आउटसारखे फीचर्स आहेत. लांब बोनटमुळे कारचा साइड व्ह्यू आकर्षक बनला आहे. ते साइड इंजिन आणि रियर-व्हील-ड्राइव्ह लेआउटवर आधारलेले असते. त्यामुळे कारला कॉम्पॅक्ट लूक आला आहे. दरवाजे उघडल्यावर कारचे सौंदर्य खुलून दिसते. केबिन सुपरकारच्या दर्जाचे नाही मात्र आरामदायी आहे.

चालकाच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करत कॉकपिटचे दोन भाग केले आहेत. प्रवासी आणि चालकादरम्यान अंतर राखण्यासाठी सेंट्रल कंसोलमध्ये ग्रॅब हँडल आहे. इंटेरिअरमुळे कारला प्रीमियम कारचा पुरस्कार मिळाला आहे. एअर-कॉन नॉब्स पकडणे सोपे आहे. स्टिअरिंगचा खालील भाग फ्लॅट आहे. त्यावर लेदर रिम आहे. हुड वर किंवा खाली केल्यास गर्मी किंवा थंडीचा परिणाम जाणवत नाही. केबिन शांत राहते. जग्वारचा दावा आहे की, कार 5 सेकंदापेक्षाही कमी वेळेत ताशी 100 किमी वेगाने धावते. ही आतापर्यंतच्या सुपरकार्समध्ये सर्वात जबरदस्त कार आहे.

व्ही 6 कार उपलब्ध नाहीत
एफ-टाइप तीन इंजिन ऑप्शन बेस 335 बीएचपी व्ही 6 , 37 बीएचपी व्ही 6 एस आणि 488 बीएचपी व्ही 8 एस उपलब्ध आहेत. व्ही इंजिन भारतात उपलब्ध नसल्यामुळे व्ही 6 एस आणि व्ही 8 एसमधून निवड करावी लागते. व्ही 8च्या तुलनेत व्ही6 एस चे बॅलेंस चांगले आणि वजन कमी आहे. दोन्ही गाड्यात इक्विपमेंट किट एकसारखे आहे.