आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- जग्वार लॅँड रोव्हर या टाटा समूहातील कंपनीच्या जागतिक पातळीवरील वाहन विक्रीत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीतील या लक्षणीय कामगिरीनंतर जेएलआरने भारताप्रमाणे चीनमध्ये भक्कम पाय रोवण्याचा विचार केला आहे.
नुकत्याच संपलेल्या वर्षात बाजारात आणलेल्या नवीन मॉडेल्समुळे जग्वार लॅँड रोव्हरच्या जगभरातील सर्व 177 प्रमुख बाजारपेठांमधील विक्रीत चांगली वाढ झाली आहे. जग्वार लॅँड रोव्हरसाठी चीन ही आता सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे. या बाजारपेठेतील कंपनीच्या मोटार विक्रीमध्ये गेल्या वर्षात लक्षणीय 71 टक्क्यांची वाढ होऊन 71,940 वाहनांची विक्री झाली. त्यामुळे भारताबरोबर चीन वाहन बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सरलेले वर्ष हे जग्वार लॅँड रोव्हरसाठी विक्रमी वर्ष ठरले आहे. आमच्या सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये कंपनीने चांगली प्रगती केली असून वाहन बाजारातील स्पर्धात्मक वातावरणातही प्रीमियम वाहनांची मागणी चांगली वाढली. व्यवसायवृद्धीला चालना देण्यासाठी गुंतवणुकीचे धोरण कायम राहील तसेच आठ नवीन वाहने बाजारात येण्याचे संकेत जेएलआर समूहाच्या विक्री कामकाजाचे संचालक फील पॉपहॅम यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.