आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग्वारने आणली 92 लाखांची कार; आसनांवर मसाजची सोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लक्झरी कार तसेच स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) निर्मितीत आघाडीवर असलेल्या जग्वार लँड रोव्हरने भारतीय बाजारात जग्वार एक्सजे 3.0 एल ही कार सादर केली आहे. या कारची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत 92 लाख 10 हजार रुपये आहे. कारमध्ये तीन लिटरचे डिझेल इंजिन आहे. भारतीय बाजारपेठेसाठी या कारची जोडणी पुण्यातील प्रकल्पात करण्यात आली आहे. देशात जोडणी केल्याने कारची किंमत एक कोटीपेक्षा कमी राखणे शक्य झाले आहे.

विशेष काय
०अनेक नव्या सुविधा असणार्‍या या कारमध्ये मागील तीन आसनांवर मसाजची सोय आहे.
०कारमध्ये एक नवा बिझनेस टेबल देण्यात आला आहे. कारची उंची वाढवण्यात आली आहे.
०एलईडीयुक्त हेडलाइट लावण्यात आली आहे. यात 8 स्पीड आॅटो प्रकारचा गिअरबॉक्स आहे.