आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Irrigation News In Marathi, Divya Marathi, Hindustan Coca Kola

जैन इरिगेशन-कोका कोला आंबा उत्पादनवाढीसाठी एकत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - आधुनिक तंत्राने आंब्याचे उत्पादन वाढवणा-या उन्नती प्रकल्पांतर्गत जैन इरिगेशन आणि हिंदुस्तान कोका कोला कंपनी ५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक १० वर्षांत करण्यात येणार असून याचा फायदा २५ हजार शेतक-यांना होणार असल्याची माहिती कोका कोलाचे सीईओ टी. कृष्णकुमार यांनी दिली.

प्रकल्पासंदर्भात त्यांनी सांगितले, जैन इरिगेशनबरोबरच्या या संयुक्त उपक्रमामुळे एक उच्च वाढ असणारी परिसंस्था उभी राहणार असून यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास चांगली मदत होणार आहे. यामुळे कंपनीच्या माझा आणि मायन्यूट या आंब्यापासून बनणा-या पेयासाठी दर्जेदार आंबा फळे मिळणार आहेत. ग्राहकांना वाजवी दरात ताजे पेय उपलब्ध होईल. या प्रकल्पांतर्गत सघन आंबा लागवड तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. उन्नती प्रकल्पाचा हा दुसरा टप्पा आहे. या प्रकल्पातून २०२२-२३ पर्यंत ३०० किलो मेट्रिक टन फळांचे उत्पादन होणार आहे.

सघन आंबा लागवड
उन्नती प्रकल्पात जैन इरिगेशनच्या साहाय्याने कोका कोला कंपनी शेतक-यांना सघन आंबा लागवड तंत्र (अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लँटेशन) शिकवणार आहे. या तंत्रामुळे एकरी ६०० आंबा झाडे वसतात. पारंपरिक पद्धतीने एकरी ४० झाडे बसतात. यामुळे शेतक-यांना भरघोस उत्पादन मिळून उत्पन्नात चांगली वाढ होते, अशी माहिती कृष्णकुमार यांनी दिली.

शेतक-यांना फायदा
जैन इरिगेशन व कोका कोला यांच्या संयुक्त उन्नती प्रकल्पाचा लाभ २५ हजार शेतक-यांना होणार आहे. कंपनी शेतक-यांची निवड करणार आहे. कोका कोला कंपनीला यामुळे दर्जेदार आंबे मिळणार आहेत.