आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींच्या ग्वाहीने सेन्सेक्सची उसळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीतील भाजपच्या दारुण पराभवाचा परिणाम आर्थिक सुधारणांवर होऊ देणार नसल्याची अर्थमंत्री अरुण जेटली यांची ग्वाही, युरोपातील बाजारातील सकारात्मक वातावरण, युक्रेन व रशियातील वाद संपण्याचे संकेत या सर्वांचा एकत्रित परिणामाने गुरुवारी शेअर बाजार तेजीने उसळला. सेन्सेक्स २७१.१३ अंकांनी वाढून २८,८०५.१० वर पोहोचला. निफ्टीने ८४.१५ अंकांच्या वाढीसह ८,७११.५५ ही पातळी गाठली.