आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो - जपानी अभियंत्यांनी चक्क इअरक्लिपच्या आकाराचा पर्सनल कॉम्प्युटर तयार केला आहे. हा कॉप्युटर कानात घालता येईल. पापण्यांची उघडझाप, नाक, भुवया ताणून किंवा जिभेच्या हालचालींनी तो ऑपरेट करता येईल. या आगळ्या कॉम्प्युटरचे वजन अवघे 17 ग्रॅम आहे. सध्या त्यावर हिरोशिमा सिटी युनिव्हर्सिटीचे इंजिनिअर अधिक संशोधन करत आहेत. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत या कॉम्प्युटरचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे.
तिसर्या हातासारखे करेल काम
हा पीसी वापरण्यासाठी युजरला हातांची हालचाल करावी लागणार नाही. यातील इन्फ्रारेड सेन्सर चेहर्यावरील हावभाव बदलल्यामुळे कानात होणार्या हालचालींना रेकॉर्ड करतात. पापण्यांची उघडझाप आणि जिभेच्या विविध हालचालींचाही त्यात समावेश आहे. पापण्यांच्या हालचालींमुळे पीसीला कोणती कमांड द्यायची, हे स्वत: युजर आपल्या सोयीनुसार ठरवू शकतो.
स्वत:चे नेटवर्क तयार करणारे उपकरण
युजर आपल्या सोयीनुसार सॉफ्टवेअर लोड करू शकतील. तसेच डाटाही स्टोअर करता येईल. या पीसीला इतर कोणत्याही उपकरणाशी जोडता येऊ शकते. मॉनिटरसोबत जोडल्यानंतर तो नेहमीच्या पर्सनल कॉम्प्युटरसारखा काम करेल. इंटरनेटला कनेक्ट केल्यानंतर हा इवला पीसी स्वत:चेच एक नेटवर्क तयार करेल. या माध्यमातून एक युजर जगभरातील इतर इअर पीसी युजरसोबत कनेक्ट होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.