आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JCB Launches 20 ton Premium Tracked Excavator Sees Flat Sales

पुण्यामध्ये जेसीबी कंपनीचा 20 टन वजनाचा एक्सकेव्हेटर तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जागतिक दर्जाचे काम भारतात होते का या शंकेला बिनतोड उत्तर देणारे उत्पादन जेसीबी इंडिया कंपनीने आज येथे पत्रकार परिषदेत सादर केले. वयाच्या अवघ्या तिशीत असलेल्या २०० हून अधिक अभियंत्यांनी कंपनीच्या पुण्यातील कारखान्यात २० टन वजनाचा एक्सकेव्हेटर तयार केला असून त्याची पश्चिम आशिया, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील देशात निर्यात केली जाते.

याबाबत माहिती देताना व्यवस्थापकीय संचालक विपिन सोंधी म्हणाले की निर्यात होत असल्याने रुपया डॉलरचा विनिमय दर लक्षात घेत महागड्या परकीय चलनाची भर देशाच्या गंगाजळीत घातली जाते. भारतात कोणत्याही भूप्रदेशात हा एक्सकेव्हेटर वापरता येत असल्याने जगातही कोणत्याही हवामानात आणि कठीण प्रदेशात तो सहजरीत्या वापरता येणार आहे. देखभालीचा कमी खर्च, इंधन बचत आणि वेगाने काम ही या उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत. वापरकर्त्याचे वर्षाला इंधनापोटी १.३ लाख रुपये वाचतात. यामुळे त्याचा वापर दुहेरी फायदा देणारा आहे.

ब्राझील ब्रिटन आणि चीनमध्ये येथील प्रकल्पात तयार होणारी उत्पादने पातःविली जात असल्याने त्याचे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्व मोठे आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की मंदीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के उलाढाल घटणार आहे मात्र केंद्र सरकारने पायाभूत सुविधा उभारणीला वेग देणारी पावले गेल्या काही दिवसात उचलल्याने आम्हाला आशा आहे.
जयपूरमध्ये पुढील पाच वर्षात ५०० कोटी रुपये गुंतवून आणखी एक प्रकल्प उभारला जातो आहे असेही त्यांनी सांगितले.