आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jet Airways Group On Friday Announced Up To 50 Percent Discounts

स्वस्तात करा विमान प्रवास; जेट एअरवेजने दिली तिकीटांमध्ये 50% ची सुट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः भारतीय विमान प्राधिकरणाच्या आक्षेपानंतरही एअरलाईन्स कंपन्यांनी स्वस्त तिकीटांचे ऑफर सूरूच ठेवले आहेत. नुकतेच स्पाईस जेटच्या तिकिटांवरील ऑपरनंतर आता जेट एअरवेजग्रूपनेही स्वस्तात विमान प्रवासाची ऑफर दिली आहे. जेट ग्रूपने शुक्रवारी आपल्या तिकिटांवर 50 टक्क्यांची सुट देण्याची घोषणा केली आहे.
जेटने आपल्या देशांतर्गत आणि इकॉनॉमी क्लासमधील तिकीटांचे दर 1499 रुपयांपर्यंत ठेवली आहे. जेट एअरवेजचे उपाध्यक्ष गौरव शेट्टी म्हणाले की, प्रवाशांना सर्व ठिकाणी सरळ जाणार्‍या विमानांच्या मुळ भाड्यात आणि इंजन दरात 50 टक्क्यांची सुट दिली आहे. 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टच्या आत तिकीट आरक्षण करणार्‍या सर्व प्रवासी सप्टेंबर आणि त्यानंतरच्या प्रवासासाठी याचा फायदा घेऊ शकतात. ही सुट जेट ग्रूपच्या सर्वच देशांतर्गत आणि थेट उड्डाणांवर लागू असेल.
इकॉनॉमी क्लासमधील प्रवासी देशांतर्गत (जेट एअरवेज आणि कमी खर्चाच्या जेट कनेक्ट दोघांमध्ये) सर्व करांसमवेत 1499 रुपयांच्या तिकिटात प्रवास करू शकतील. यापूर्वी मागील आठवड्यात जेट एअरवेजने त्यांचा परदेशी गुंतवणूकदार एतिहाद एअरवेज यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय मार्गांवर सुट देण्याची घोषणा केली होती.
दुसरीकडे स्पाईस जेटतर्फे 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान आरक्षण केल्यानंतर देण्या्त येणार्‍या सुटमुध्ये देशांतर्गत प्रवासाचे प्रवासभाडे 2099 रुपये एवढे ठेवले आहे. या सुटे अंतर्गत एक सप्टेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान प्रवासी याचा फायदा घेऊ शकतील.
स्पाईस जेटने जानेवारीमध्ये स्वस्त प्रवास भाड्याच्या युध्दाची सुरूवात केली होती. तेव्हा स्पाईस जेटने 50 टक्के सुट देत विमान तिकिटांच्या विक्रीस सुरूवात केली होती. त्यानंतर इतरही अनेक विमान कंपन्यांनी याचे अनुकरण केले होते. यामध्ये एअर इंडियाचाही समावेश होता. यानंतर आतापर्यंत स्पाईस जेटने आतापर्यंत 12 वेळा अशाप्रकारची सुट दिली आहे.