आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेट एअरवेजला पुन्हा नफ्याचे पंख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या सलग पाच तिमाहींपासून तोट्याच्या खराब हवामानात घिरट्या घालत असलेल्या जेट एअरवेजला जूनअखेर संपलेल्या तिमाहीने मात्र नफ्याचे पंख दिले आहेत. गेल्या वर्षात जूनअखेर संपलेल्या तिमाहीत 123.2 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्यानंतर कंपनीला यंदा याच कालावधीत 36.4 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन तोटा सहन करावा लागला असून तो 170.3 कोटी रुपयांचा झाला होता. त्यामुळे या वेळचा नफा सर्वाधिक असल्याचे जेट एअरवेजने म्हटले आहे.
व्याज, कर, घसारा, पुनर्बांधणी किंवा भाडे खर्चपूर्व मिळकतीमध्ये तब्बल 148 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या 333 कोटी रुपयांवरून 825.5 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे विदेशी चलनामुळे झालेल्या तोट्यापासून थोडाफार आधार कंपनीला मिळाला आहे. स्थानिक विमान वाहतुकीत 10 टक्के वाढ झाल्यामुळे जेट एअरवेज समूहाचा महसूल 31.4 टक्क्यांनी वाढून तो 5,274.8 कोटींवर गेला आहे. वाढता इंधन खर्च आणि डॉलरच्या तुलनेत घसरणाºया रुपयामुळे विमान उद्योगाच्या नफ्यावर परिणाम होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.