आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट, एतिहादची विमान तिकिटांवर 20 ते 50 %सूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खासगी विमान वाहतूक कंपनी जेट आणि तिची 24 टक्के भागधारक भागीदार एतिहाद कंपनीने गुरुवारी विमान प्रवासावर सवलतीची घोषणा केली. त्यानुसार कंपनीच्या 135 आंतरराष्ट्रीय उड्डाणावर प्रवास करणार्‍यांना विमान तिकिटांत 20 ते 50 टक्के सवलत मिळणार आहे.
जेट एअरवेज आणि एतिहाद एअरवेजच्या इकॉनॉमी आणि बिझनेस श्रेणीतील प्रवाशांना ही सवलत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जेट आणि एतिहाद या दोन्ही कंपन्यातील कराराला बुधवारी मान्यता मिळाली. त्यानंतर या कंपन्यांनी ही 72 तासांची प्रारंभिक ऑफर सादर केली. त्यानुसार 25 जुलै ते 27 जुलै या काळात आरक्षण करून एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात या प्रवास करता येईल.