आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jet Edihad Agreement Sanctioned By Foreign Direct Promotion Board

जेट-एतिहाद कराराला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिली मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जेट एअरवेजला अबुधाबीची सरकारी एअरलाइन्स एतिहादला आपली 24 टक्के भागीदारी 2,054 कोटी रुपये विकण्यास विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी)ने सशर्त मंजुरी दिली आहे. त्याबदल्यात एतिहादने जेटवर नियंत्रण कमी करण्यास संमती दर्शवली आहे.

जेट व्यवस्थापनाला भारतीय कायद्यानुसार काम करावे लागेल, असे हवाई वाहतूक मंत्री अजित सिंह यांनी सांगितले. कंपनीचे मुख्यालय मुंबईत राहणार आहे. करारावरून अनेक खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जेटवर एतिहादचे संपूर्ण नियंत्रण राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. करारामुळे एतिहादला भारतातील वाढत्या बाजारपेठेत प्रवेश मिळेल. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या ‘प्राइसवॉर’मुळे जेटला झालेला तोटा 2,058 कोटी रुपयांमुळे भरून निघू शकेल. कराराला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई शेअर बाजारात जेटच्या समभागाने 4.2 टक्क्यांची उसळी घेतली.


जेट-एतिहाद करार
शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल नसेल. जेटचे मालक नरेश गोयल यांच्याकडे 51 टक्के आणि एतिहादकडे 24 टक्के समभाग.
प्रस्तावात जेटच्या 12 सदस्यीय मंडळावर एतिहादचे दोन सदस्य.
नरेश गोयल यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबरोबर त्यांच्याकडे चार बोर्ड सदस्यांच्या नियुक्तीचा हक्क असेल. एतिहादकडून उपाध्यक्षाची नियुक्ती.
जेट कंपनीचे महसूल व्यवस्थापन अबू धाबीमध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव होता. तो काढून टाकण्यात आला आहे.