Home | Business | Gadget | jet oil,

जेट इंधनाच्या किमतीत वाढ

वृत्तसंस्था | Update - Jul 16, 2011, 03:06 AM IST

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून जेट इंधनाच्या भावात प्रति किलोलिटरमागे ७८ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

  • jet oil,

    नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून जेट इंधनाच्या भावात प्रति किलोलिटरमागे ७८ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणा-या मुंबईत उद्यापासून ५६,९६४.०१ रुपये प्रति किलोलिटर ऐवजी आता ५७,०३१.६६ रुपये प्रतिकिलोलिटर मोजावे लागतील.
    या इंधनदरवाढीचा प्रवासी विमान भाड्यावर काय परिणाम होईल याबद्दल एअरलाइन्स कंपन्यांकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. एअरलाइनच्या संचालन खर्चात इंधनाचा ४० टक्के वाटा असतो व स्थानिक विक्री करानुसार प्रत्येक विमानतळानुसार दरांत फरक पडतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्या मागील पंधरवड्यातील सरासरी आतंरराष्टÑीय किमतीनुसार जेट इंधनांच्या किमतीत बदल करतात.

Trending