आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Solanky Artical On New Year Investment Planing

समृद्धीसाठी नवीन वर्षात स्वत: ठरवा स्वत:ची ध्येये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014 हे नवे वर्ष आता खर्‍या अर्थाने सुरू झाले आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने स्वत:साठी ध्येय ठरवण्याची ही वेळ आहे; पण बहुतांश लोक अशा प्रकारचे ध्येय ठरवू शकत नसल्याची कारणे शोधताना दिसतात. मग ते घर खरेदी करणे असो, कार खरेदी असो किंवा सुट्यांचे नियोजन असो. नवीन व्यवसाय सुरू करणार्‍यांसाठीही अनेकदा नवीन वर्ष हे यशाची शिदोरी घेऊन येऊ शकते. काही धोरणे ठरवून त्यांना अनेक शिखरे काबीज करता येतात. असेच तुम्हाला नवीन वर्षात करता येतील असे आर्थिक संकल्प किंवा वचने खालीलप्रमाणे..
1 बजेट बनवा : हे जीवनातील अत्यंत साधारण ध्येय आहे. खर्चाचे नियोजन म्हणजेच कमी खर्च आणि अधिक बचत तुम्ही बजेट ठरवल्यानंतरच शक्य आहे. नियंत्रित खर्च, बचत आणि भविष्यासाठी तरतूद या तिन्ही बाबी आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही आजवर असे केले नसेल, तर जानेवारी महिन्यात तुम्ही पहिले बजेट तयार करू शकता. त्यामुळे खर्चावर नजर, तर राहिलच; पण खासगी जीवनात शिस्त लागण्यासही मदत होईल.
2. ध्येय ओळखा : मोठय़ा कालावधीसाठी आर्थिक ध्येय ओळखणे आणि ते पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे, हा आर्थिक नियोजनातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. खासगी आणि आर्थिक ध्येय ठरवल्याशिवाय आर्थिक नियोजन पूर्ण होऊ शकत नाही. ध्येय ठरवले नाही, तर स्वत:च्या यशाचे मूल्यांकनही करता येणार नाही. त्यामुळे लघु व दीर्घ कालावधींचे ध्येय ओळखून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. जर लघु कालावधीतील ध्येय पूर्ण झाले नाही आणि त्यासाठी तुम्ही अधिक कर्ज घेतले, तर त्यामुळे निवृत्तीसारख्या दीर्घकालीन ध्येयांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरजा आणि त्यापैकी कोणत्या तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे, याबाबत जागरूक राहावे. ध्येय ओळखून त्यानुसार बचतीची योग्य गुंतवणूक करायला हवी.
3. अधिक कर्ज टाळा : अनेक जण व्हेकेशन किंवा लग्न कार्यात भेटवस्तू देण्यासाठीही कर्ज काढतात; पण ते हवे. कमी कालावधीच्या ध्येयांसाठी सहा महिन्यांपूर्वीच बचत सुरू करायला हवी. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरील उधारी महागात पडू शकते. त्यामुळे कुटुंबाचे बजेटही बिघडू शकते.
4. जागरूक राहा : गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबाबत नेहमी माहिती घेत राहा. जर तसे केले नाही, तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता किंवा एखाचे चुकीचे उत्पादन तुमच्या गळ्यात पडू शकते. काही लोक युलिप प्लॅनसारख्या कॉम्बो प्रोडक्ट्सच्या मदतीने आपले ध्येय मिळवू इच्छित असतात; पण ते योग्य नाही. नियोजन केल्यास तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती गुंतवणूक करायची याचा अंदाज येतो. तसेच र्मयादित साधने असली, तरी अँसेट क्लासमध्ये इफेक्टिव्ह अँलोकेशन करता येते. बचत आणि गुंतवणुकीची शिस्त लागली, की आपले निर्णय सुधारण्यासही मदत मिळते.
5. वचनांची समीक्षा करा : अनेकांनी गेल्या वर्षी स्वत:लाच दिलेली काही वचने असतील; पण ती प्रू्ण करण्यात तुम्हाला यश मिळाले, की पुढच्या वर्षी आणखी काही तरी उत्तम करू हेच तुम्ही स्वत:ला समजावत राहिले याची समीक्षा करा. जर तुम्ही ध्येय पूर्ण करण्यात अपयशी ठरले असाल, तर अपयशाच्या कारणांचे समीक्षण करा. ते सुधारण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला त्यात काही अडचणी असतील, तर एखाद्या फायनान्शियल प्लॅनरची मदत घेऊ शकता.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
jp.solanki@dainikbhaskargroup.com