आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jobforyuva News In Marathi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Mumbai

युवासेनेच्या \'jobsforyuva\'चे मातोश्रीवर लॉंचिंग, बेरोजगारांना मिळेल माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील तरुणांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युवासेनेने 'Jobsforyuva.com' या वेबसाइटची निर्मिती केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'Jobsforyuva.com'चे 'मातोश्री'वर उद्‍घाटन करण्यात आले. आयटी रॉकर्सच्या सागर मधूकर परदेशी आणि टीव्ही पत्रकार राजेश कोचरेकर यांनी Jobsfoyuva.com ची निर्मिती केली आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. सरकारी आणि खासगी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून देखील त्या युवावर्गापर्यंत पोहोचत नाहीत. यासर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही वेबसाइट तयार करण्‍यात आली आहे.

महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना नोकरीच्या संधीची माहिती उपलब्ध करून रोजगार मिळावा, यासाठी सागर परदेशी यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन 'jobsforyuva' ही संकल्पना सांगितली होती. आदित्य ठाकरे यांनी संकल्पनेची व्याप्ती ओळखून उपयुक्त प्रोजक्त सुरु करण्‍यास सांगितले. अल्पावधीतच सागर परदेशी आणि त्यांच्या टीमने युवावर्गासाठी महत्वपूर्ण असलेल्या 'jobsforyuva.com' ही वेबसाइट अस्तित्वाात आणली.

'jobsforyuva.com' लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'मातोश्री'वर करण्‍यात आले. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे उपस्थित होत्या.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, युवावर्गाला मिळेल बायोडेटा बनविण्यापासून ते थेट नोकरी मिळेपर्यंत सर्व सहकार्य...