आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jolla Saifish Smartphone A Brief Introduction Of New Os

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकियाच्या माजी कर्मचार्‍यांनी बनवला स्मार्टफोन, वाचा काय आहे \'Sailfish\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Jolla Smartphone)

'जोला' कंपनीने आपला पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नो‍कियाच्या माजी कर्मचार्‍यांनी या स्मार्टफोनची निर्मिती केली आहे. 'जोला'च्या न्यू फोनचे काम 'सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम'वर (Sailfish) आधारित आहे.
ई कॉमर्स कंपनी 'स्नॅपडील'वर हा फोन उपलब्ध झाला असून याची किंमत 16,499 रुपये आहे. नेक्स्ट जनरेशनला डोळ्यासमोर ठेवून स्मार्टफोन लॉन्च करण्याचा 'जोला'ची पुढील योजना आहे.

'सेलफिश'चे वेगळेपण काय?
'सेलफिश'चे वेगळेपण म्हणजे, Yandex, Aptoide अथवा Android च्या अॅप्स इन्स्टॉल केले जाऊ शकते. 'सेलफिश' हे न्यू ऑपरेटिंग सिस्टमही नोकियातील माजी कर्मचार्‍यांनी विकसित केले आहे. नोकियामध्ये हे कर्मचारी 'MeeGo' ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत होते. 'MeeGo' प्रोजेक्ट 'इंटेल' कंपनीच्या सौजन्याने डेव्हलप करण्यात येत आहे.
'जोला स्मार्टफोन'सोबत रिप्लेसेबल बॅक कव्हर देण्यात आले आहे. 'स्नॅपडील'वर पहिल्या 90 यूनिट्सच्या ऑर्डरवर यूजर्सला रेड, ब्लॅक आणि यलो बॅक कव्हर अगदी मोफत दिले जाणार आहेत.
The Economic Timesच्या वृत्तानुसार, व्यवसाय वृद्धीच्या पार्श्वभूमीवर जोला कंपनीने 'सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम' मोबाइल निर्माता कंपन्यांना 'फ्री' देण्याचा निर्णय घेतला आहे. 'सेलफिश' हे जगातील पहिले नॉन अमेरिकन ऑपरेटिंग सिस्टम आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सेलफिश ऑपरेटिंग सिस्टमविषयी आणि जोलाचे फीचर्स...