आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Just Dial Stock Rally Helps Amitabh Bachchan\'s Holding Grow To Rs. 10 Crore

अमिताभ बच्‍चन यांनी \'JUST DIAL\'च्या मधून कमावले तब्बल 10 कोटी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- स्थानिक सर्च इंजिन 'जस्ट डायल'च्या माध्यमातून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्‍चन यांनी अवघ्या सात महिन्यात 10 कोटी रुपये कमावले आहे. अमिताभ यांनी 'जस्ट डायल'मध्ये गुंतवलेल्या रकमेत अवघ्या सात महिन्यात अडीच पटीने वाढ झाली आहे. आता ही रकम 10 कोटींच्या घरात पोहोचली आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार, 5 जून, 2013 रोजी बच्चन यांनी खरेदी केलल्या शेअर्सचे मुल्य 3.83 कोटी रुपये होते. आता त्यात 161 टक्के वाढ झाली आहे. या शेअर्सची किमत 10 कोटी रुपये झाली आहे.

शेअर बाजारात उतरल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच 'जस्ट डायल'च्या शेअर्सच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. सुरुवातीला 'जस्ट डायल'च्या एका शेअरचे मुल्य 611.45 रुपये होते. गेल्या 3 जानेवारीला त्यात अभूतपूर्व वाढ दिसून आली. सध्या एका शेअरचे मुल्य 1603.5 रुपये आहे. 'जस्ट डायल' डिसेंबर, 2010 मध्ये अमिताभ बच्चन यांना तीन वर्षांसाठी 'ब्रंड अँम्बेसडर' केले होते. बच्चन यांना 2011मध्ये 10-10 रुपयांचे 62794 शेअर देण्यात आले होते.
स्टॉक एक्सचेंजमधील यादीत जस्ट डायलची शेअर व्हॅल्यू पाहण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाइड्‍सवर..