आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट्रॉइट ऑटो शोमध्ये सादर झाल्या यंदा येणा-या कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्व प्रकारच्या वाहन प्रदर्शनांत कार मोट्या प्रभावी पद्धतीने सादर करण्यात येतात. मात्र, जेव्हा मोटार सिटी डेट्रॉइटमध्ये अशा प्रकारे सादर होणा-या कारमध्ये विशेष काही ना काही तरी असतेच. डेट्रॉइट येथील हे वाहन प्रदर्शन 13 जानेवारीपासून सुरू झाले असून यात अनेक कन्सेप्ट कार सादर करण्यात आल्या आहेत. बहुतेक कार निर्मात्यांचा नवे मॉडेल सादर करण्यावर भर आहे. वर्षाच्या प्रारंभी होणा-या या प्रदर्शनात आगामी 12 महिन्यांत बाजारात दाखल होणा-या कार सादर करण्यात येतात. यंदा अशा ज्या कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, त्यांचा हा आढावा...
० मर्सिडीझ -बेंझ सी-क्लास : सध्या ज्या कारची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात केली जात आहे, त्यापैकीच एक ही कार आहे. त्याला कारणही आहे. कंपनीची आगामी पाच वर्षे या कारवर मदार राहणार आहे. नव्या सी-क्लास कारचे सादरीकरण मर्सिडीझने डेट्रॉइट येथील प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला केले. नव्या सी-क्लासचे आंतरबाह्य बदललेले स्वरूप जगासमोर आले. या कारचे वजन 100 किलो कमी आहे आणि यात नवीन इंजिनाची श्रेणी लावण्यात आली असून ती पूर्वीच्या इंजिनापेक्षा जास्त किफायतशीर आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, ही पहिली छोटी मर्सिडीझ कार असून ती खरे तर बेबी एस-क्लास आहे.
० शेव्हरले कॉरव्हेट सी-7झेड 06 : डेट्रॉइट आणि मसल कारचा संबंध तसा जुना आहे. जुहू चौपाटी व चाट, हैदराबादची बिर्याणी आणि चांदनी चौकातील पराठे हे जसे समीकरण आहे तसेच मसल कार आणि डेट्रॉइट हे समीकरण पक्के आहे. अशा कारची जन्मभूमीच डेट्रॉइट आहे. शेव्हरले सी-7 झेड06 लक्ष वेधून घेणा-या आकर्षक लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार शेव्हरले सी-7 चे अद्ययावत रूप आहे. यात 6.2 लिटर व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे. ही कार 635 एलबी टॉर्कसह 625 बीएचपी शक्ती उत्पन्न करते. झेड06 ची ही आवृत्ती छत बाजूला सरकवण्याच्या रूपात आली आहे. यात 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्यायदेखील आहे.
पोर्श 911 टर्गा : नव्या पोर्श 911 टर्गाच्या क्लासिक रूफ डिझाइनने सर्वांना चकित केले आहे. पोर्शला हेच हवे असल्याचे भासते. या कारने 1967 च्या मूळ कारची आठवण ताजी केली.
याची मागच्या बाजूची काहीशी उठावदार असणारी स्क्रीन मागच्या बाजूने आणखी वळवणे आता शक्य आहे. रेग्युलर 911 प्रमाणेच अद्ययावत टर्गामध्येही फ्लॅट सहा पेट्रोल इंजिनची रेंज आहे. पोर्शचे वितरक लवकरच याची बुकिंग सुरू करणार आहेत.
० लेक्सस आरसी-एफ कुपे : मागच्या वर्षी जेव्हा मूळ लेक्सस आरसी कुपेचा कन्सेप्ट दाखवण्यात आला होता तेव्हा लेक्सस याला एफ ट्रीटमेंट देणार याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. कंपनीने नव्या आरसी-एफवरील पडदा दूर केला आहे. त्याबरोबरच या संदर्भातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जेव्हा ही कार बाजारात येईल तेव्हा बीएमडब्ल्यू एम 4 च्या तुलनेत 450 बीएचपीपेक्षा जास्त शक्तिशाली कुपे असेल असे लेक्ससला वाटते. त्याशिवाय यात कुशल अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला असून यात 5.0 लिटर व्ही 8 इंजिनाचा समावेश आहे. मात्र ही चांगली कामगिरी करणारी सलून कार आणि कुपे राहील का? ती पाहिल्यानंतर एवढेच म्हणता येईल की ही एक आकर्षक कार आहे.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.