आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabir Mahajan Article About Car Customization In Marathi

देशातील कार कस्टमायझेशन बाजारपेठेत सुधारणेला वाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात प्रत्येक व्यक्ती आपण दुसर्‍यापेक्षा कसे वेगळे आहोत हे ठसवण्याच्या प्रयत्नात असते. महिला मंडळी आपल्या साड्या आणि दागिन्यांबाबत संवेदनशील असतात तर पुरुष मंडळी आपल्या वाहनांबाबत. एक कोटी रुपयांची कार खरेदी करणारा अतिश्रीमंत असो किंवा आपल्या कुटुंबासाठी छोटी कार घेणारा व्यापारी असो. प्रत्येक जण आपल्या वाहनांत काही तरी वेगळे असावे या प्रयत्नात दिसतो.

हिंदी चित्रपटातले हिट गाणे लगेच गाडीच्या रिव्हर्स हॉर्नची धून बनते. कार डेकोरमध्ये असणारे कर्कश हॉर्न डोकेदुखी बनले आहेत. आसनच्या सजावटींसाठी इतक्या रंगांची उपलब्धता आहे की त्यापुढे आकाशातील तारे कमी पडावेत. कस्टमायझेशनसाठी मोठी मागणी असतानाही भारतात कार कस्टमसाठी संघटित बाजारपेठेची वानवा आहे. मूठभर मंडळीच या दिशेने प्रयत्नशील दिसतात. यापैकी मुंबईतील दिलीप छाबडिया हे एकमेव नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना दिसते.

कार आणि मोटारसायकल क्षेत्रातील कस्टमायझेशन कल्चरचा विचार केल्यास अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीच्या तुलनेत आपल्या देशात मोठा फरक दिसून येतो. अमेरिकेत कार कस्टमायझेशन या विषयाशी निगडित अनेक टीव्ही कार्यक्रम सुपरहिट झाले आहेत, जसे की पिम्प माय राइड, वेस्ट कोस्ट कस्टम्स आदी. लंडनमधील अ श्रेणीच्या कस्टमाइज्ड रेंड रोव्हरसाठी ओव्हरफिंच, काहन आणि रिंवीर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तर जर्मनीत ट्युनिंग हाउस एएमजी, एम डिव्हीजन आणि अल्पाइना वर्ल्डवाइड हे ब्रँड प्रमुख आहेत. या ट्युनिंग ब्रँड्सनी भारतात व्यवसाय का सुरू केला नाही?हा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा असून या क्षेत्रात जास्त प्रतिभावंत का पुढे आले नाहीत?हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या प्रश्नांनाही दोन उत्तरे आहेत. पहिले म्हणजे मेकॅनिकल ट्युनिंग उद्योगांची वानवा आणि दुसरे म्हणजे मोटारस्पार्टची कमतरता. दिल्लीला एफ-1 मिळाली हे दर्शकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी देशात कस्टम्स आणि ट्युनिंग उद्योग मिळाला तर तो फक्त मोटारस्पोर्टकडूनच मिळू शकतो.

आपल्याकडील वस्तू कशी दर्जेदार आणि वेगळी आहे, असे प्रत्येक भारतीय आपल्या शेजार्‍याला दाखवण्यासाठी उत्सुक असतो. कस्टमायझेशन बाजाराचीही मुख्य गरज आहे. कारच्या बाबतीत आपली रचनात्मकता दाखवण्यास फारसा वाव मिळत नाही. मोटारसायकलधारकांचे बाइकर्स क्लब आणि गट आहेत. मात्र, कारच्या बाबतीत असे नाही. त्यामुळे कारचा देखावा करण्यात जास्त रस घेतला जात नाही. जोपर्यंत कारवर पैसे खर्च करण्याची भूक लोकांना लागत नाही, तोपर्यंत या क्षेत्रातील बाजारपेठेत अशीच स्थिती राहील.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.