आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabir Mahajan Article About Compact Sedan Car, Divyamarathi

कॉम्पॅक्ट सेडान बनणार का ऑटो उद्योगाची ओळख ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रत्येक देशात त्या देशाची ओळख बनलेली आणि त्यांच्या ऑटो उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तरी कार आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. जसे चांगला पिकअप असणारे मोठे ट्रक आणि मसल कार ही अमेरिकेची ओळख आहे. कन्व्हर्टिबल कारसाठी ब्रिटनला ओळखले जाते. मोठय़ा हॅचबॅक आणि स्टेशन वॅगन कार ही युरोपची ओळख आहे, तर 660 सीसीच्या छोट्या कारसाठी जपानला ओळखले जाते.

त्याचप्रमाणे पैसा वसूल करून देणार्‍या, इंधन किफायतशीर आणि कमी देखभालीच्या कारनिर्मितीसाठी भारताची अनेक वर्षांपासून ओळख आहे. मात्र, आता देशातील ऑटो उद्योग नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये ही बाब स्पष्ट झाली. कॉम्पॅक्ट सेडान कार भारतीय ऑटो उद्योगाची नवी ओळख होईल, असे बहुतेक कार निर्मात्यांना वाटते आहे.

चार हजार एमएमपेक्षा कमी लांबीची कार एक ते 1.5 लिटर पॉवरच्या इंजिनसह येत नाही. अनेक कार निर्मात्यांनी अशा प्रकारच्या कार सादर केल्या. अनेक कंपन्यांनी यातील शक्यता पडताळून पाहिली. यात टाटा जेस्ट, ह्युंदाई अँक्सेंट यांचा समावेश आहे. या कार यंदाच्या अखेरपर्यंत शोरूममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. फोर्ड फिगो कन्सेप्ट कार 18 ते 24 महिन्यांत वितरकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की, प्रत्येक कार कंपनी याच सेगमेंटमधील कार सादर करण्यास का इच्छुक आहे? उत्तर स्पष्ट आहे. कारण अशा कारची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. ही मागणी जाणवण्याइतकी लक्षणीय आहे. मारुती-स्विफ्ट बाजारात आल्यापासून तिचा आघाडीचा झेंडा उंचच उंच फडकतो आहे. अलीकडेच होंडा अमेझ कारच्या यशाने इतर कार निर्मात्यांना मागे टाकले आहे.

मात्र, हा नवा सेगमेंट भारतीय कार उद्योग आणि ग्राहकांसाठी फायदेशीर राहील का? अल्पकाळाचा विचार केल्यास याचे उत्तर ‘होय’ असे आहे. अशा स्वरूपाची कार निश्चितच कंपन्यांच्या विक्रीसाठी फायदेशीर ठरली आहे. ज्याप्रमाणे 15 वर्षांपूर्वी हॅचबॅक कार जशा यशस्वी ठरल्या होत्या, तो ट्रेंड आजही टिकून आहे. मात्र, भविष्याचा विचार केल्यास कॉम्पॅक्ट सेडान कारच्या यशाबद्दल मला शंका आहे. प्रत्येकाला पसंत पडेल अशी कार तयार करणे कोणत्याही कार कंपनीला शक्य नाही. मारुतीने दोन, टाटाने एक कार सादर केली. होंडानेही एक कार सादर केली. मात्र, डिझायर, इंडिगो सीएस किंवा अमेझ यापैकी कोणतीच कार अशी नाही, जी ही स्पर्धा जिकू शकेल. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये आपल्या स्पर्धक हॅचबॅकच्या तुलनेत काही खास लाभ होणार नाही. ड्रायव्हिंग असो की कारची मागची बाजू, अशा कारमधील समस्या येथेच दिसून येतात.
(लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.)
(kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com)