आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त टॅब्लेटमध्ये ‘कार्बन स्मार्ट’ची भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात आता स्वस्त टॅब्लेट पीसीचे वादळ चांगलेच घोंगावू लागले असून या वादळात आता कार्बन मोबाइलची भर पडली आहे. स्वस्तातला मोबाइल बाजारात आणून खळबळ माजवणाºया या कंपनीने आता ‘कार्बन स्मार्ट टॅब 1 ’ हा आणखी एक स्वस्त टॅब्लेट बाजारात सादर केला आहे. विशेष म्हणजे या टॅब्लेटमध्ये सध्याची क्रांतिकारी अ‍ॅँड्रॉइड 4.1 जेली बीन आॅपरेटिंग प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंतचे अ‍ॅँड्रॉइडचे सर्वात गतिमान आणि सोपे रूप असलेले आधुनिक तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिले असल्याचा दावा कार्बन मोबाइलने केला आहे.
नेटवर्किंगमधील अव्वल, मोबाइल आणि एम्बेडेड अ‍ॅप्लिकेशन्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमआयपीएस टेक्नॉलॉजीज इन्क. तसेच नावीन्यपूर्ण प्रोसेसर तंत्रज्ञान विकसित करणाºया इन्जेनिक सेमी कंडक्टरबरोबर सहकार्य करार करून कार्बन मोबाइल्सने जगातील हा पहिला अँड्रॉइड 4.1 ‘जेली बीम’ स्मार्ट टॅब 1 टॅब्लेट बाजारात दाखल केला असल्याचा दावा केला आहे.
अँड्रॉइड इको सिस्टीम (अँड्रॉइड 4.1-जेली बीन)मधील आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची इच्छा असलेल्या भारतातील तंत्रज्ञान ग्राहकांना हे उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रांतिकारी कार्बन स्मार्ट टॅब 1 आणण्यात आला असून तो कार्बनच्या संकेतस्थळावर प्री-बुक पद्धतीने उपलब्ध असो. कार्बन मोबाइल्स ग्राहकांना प्री-लोडेड पद्धतीने अँड्रॉइड 4.0.3 (आइस्क्रीम सँडवीच) वरून अँड्रॉइड 4.1(जेली बीन) प्लॅटफॉर्मवर विनामूल्य अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कार्बन स्मार्ट टॅब 1 यासारख्या उत्पादनांच्या माध्यमातून टॅब्लेट बाजारपेठेत अव्वल स्थान पटकावण्याचा इरादा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी व्यक्त केला असून प्रतिमहा 200 टॅब्लेटची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याच सांगितले. यासाठी कंपनी एंटरप्राइझ बिझनेस सोल्युशन्स विभाग, शिक्षण, आरोग्य निगा, हॉस्पिटॅलिटी या व्यवसायांवर अधिक लक्ष
केंद्रित करणार आहे.

जेली बीन टॅब्लेटची वैशिष्ट्ये
डी ग्रॅव्हेटी सेन्सॉर, वाय-फाय, यूएसबी डोंगलसह 3 जी साहाय्य, 2 एमपीचा दर्शनी कॅमेरा, प्री-एम्बेडेड अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्यात कार्बन स्मार्ट ब्राऊझर आणि कार्बन स्मार्ट गेम्स, लोकल अ‍ॅप्स यांचा समावेश असून त्यात टाइम्स आॅफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स अ‍ॅप, फेसबुक आणि इतरही बºयाच गोष्टींचा समावेश आहे.
किंमत - 6990 रु.