आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karbonn Launches 4 Budget Smartphones, Including 2 KitKat Based Models

\'कार्बन\'ने लॉन्च केले चार स्मार्टफोन; सगळ्यांच्या किंमती पाच हजारांच्या आत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्बन कंबनीने 2699 ते 4999 रुपये किंमतीच्या रेंजमधील चार ड्यूल-सिम स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यात स्मार्ट A52 प्लस, स्मार्ट A11 स्टार, स्मार्ट 12 स्टार आणि स्मार्ट A50S यांचा समावेश आहे. चारपैकी दोन स्मार्टफोनचे अँड्रॉयड 4.4.2 किटकॅटवर काम चालते.

किंमत
'कार्बन स्मार्ट A50S' याला आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन सांगितले जात आहे. याफोनची किंमत 2699 रुपये आहे. 'कार्बन स्मार्ट A52 प्लस'ची किंमत 3099 रुपये, 'कार्बन स्मार्ट A12 स्टार'ची किंमत 4099 रुपये तर 'कार्बन स्मार्ट A11 स्टार'ची किंमत 4499 रुपये आहे. सध्या सगळ्या फोनची विक्री फक्त ऑनलाइन शॉपिंग साइट 'फ्लिपकार्ट'च्या माध्यमातून केली जात आहे.

'कार्बन स्मार्ट A11 स्टार' आणि 'कार्बन स्मार्ट A12 स्टार'मध्ये किंचीत‍ फरक....
या दोन्ही फोनमध्ये फक्त किंमत आणि डिस्‍प्‍लेमध्ये फरक आहे. 'कार्बन स्मार्ट A11 स्टार'ची 4499 रुपये तर 'कार्बन स्मार्ट A12 स्टार'ची किंमत 4099 रुपये आहे. दोघांच्या किंमतीत फक्त‍ चारशे रुपयांचा फरक आहे. तसेच डिस्‍प्‍लेमध्ये 0.3 इंचाचा फरक आहे. 'कार्बन स्मार्ट A11'मध्ये 800x480 पिक्सल रेझॉल्‍युशन असलेला 4.3 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे तर जबकि 'कार्बन स्मार्ट A12'मध्ये चार 4 इंचाचा डिस्प्ले बसवलेला आहे. अन्य फीचर्स एकसारखे आहेत.

दोन्ही फोनचे अँड्रॉइड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर काम चालते. ड्युअलसिम फोन आहेत. 1.2 GHz ड्यूल-कोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. 512 MB रॅम आहे. यात 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंटला व्हीजीए कॅमेरा आहे. 4 GB इंटरनल स्‍टोरेज आहे. 32 GB पर्यंत ते वाढवताही येऊ शकते. बॅटरी 1400mha असून दोन्ही फोन 3G ला सपोर्ट करतात.

'कार्बन स्मार्ट A52' आणि 'कार्बन स्मार्ट A50S'
दोन्ही फोनमध्ये 400 रुपयांचे अंत आहे. 'कार्बन स्मार्ट A52'ची 3099 रुपये तर
'कार्बन स्मार्ट A50S' 2699 रुपये किंमत आहे. दोन्ही 2G फोन आहे. अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर दोन्ही फोन चालतात. दोघांमध्ये 480x320 पिक्सल रेझॉल्युशन असलेला 3.5 इंचाचा आयपीएस डिस्प्ले बसवलेला आहे.

'कार्बन स्मार्ट A52'मध्ये 1.2 GHz चे ड्यूल-कोर मीडियाटेक प्रोसेसर आणि 512 एमबी रॅम आहे. मात्र, 'कार्बन स्मार्ट A50S' मध्ये 256 एमबीची रॅम आहे. दोन्ही फोनला 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंटला व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. 32 GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढवता येऊ शकते. मात्र, इंटरनल स्‍टोरेजबाबत 'कार्बन स्मार्ट A50S' मागे आहे. 2 GB चे इंटरनल स्टोरेज देर्यात आले आहे. 'कार्बन स्मार्ट A52'मध्ये 4 GB चे स्टोरेज आहे. बॅटरीबाबत सांगायचे झाले तर 'कार्बन स्मार्ट A52'मध्ये 1300mAh तर 'कार्बन स्मार्ट A50S' मध्ये 1100mAh बॅटरी आहे.
(फाईल फोटो)