मुंबई - स्मार्टफोन मोबाइल कंपन्यांनी आता आपले लक्ष द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांकडे वळवले आहे. या शहरांमधील ग्राहकांना किफायतशीर दरात स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याकडे कल वाढत आहे. कार्बन या कंपनीनेदेखील ‘ किटकॅट’ प्रणालीवर आधारित ‘कार्बन टिटॅनियम एस 99’ हा नवा स्मार्टफोन वाजवी किमतीत बाजारात दाखल केला आहे.
गतिमान वैविध्यपूर्णता, जलद प्रोसेसिंग आणि उत्तम ग्राहकांचा प्रतिसाद ही वैशिष्ट्ये असलेला हा नवा मोबाइल एसएमएस, एमएमएसच्या एकात्मिकतेतून सुधारित हँगआऊट्स अॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्क गरजा पूर्ण करतो.‘ओके
गुगल’ द्वारे ग्राहकाचे तत्कालीन स्थळ, आवडते स्थळ, टीव्ही कार्यक्रमाची माहिती दिली जाते. स्मार्टर कॉलर आयडी, गतिमान वैविध्यपूर्णता, सुधारित अॅप डाऊनलोड आणि सोपी होमस्क्रीन या वैशिष्ट्यांमुळे किटकॅट महत्त्वाचे असल्याचे कार्बनचे कार्यकारी संचालक शशीन देवसरे यांनी सांगितले.
कसा आहे नवीन ‘ टिटॅनियम एस 99’
> अंतर्गत साठवणूक क्षमता चार जीबी, मेमरी 32 जीबीपर्यंत विस्तारणे शक्य
> फोन दुहेरी सिमने युक्त असून त्यात थ्री-जी कनेक्टिव्हिटी
> 1400 एमएएचच्या भक्कम अशा बॅटरीमुळे उत्तम बॅकअप
> टच अँड कस्टमायझेबल डिजिट्स व स्मार्ट नोटिफिकेशन पॅनल
> रंगसंगती : काळा, पांढरा