आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karbonn Mobile News In Marathi, Smartphone, Investment, Divya Marathi

कार्बन होणार आणखी स्मार्ट; 700 कोटींची गुंतवणूक करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - परवडणा-या मोबाइल्सची निर्मिती करण्यात आघाडीवर असलेल्या कार्बनने स्मार्टफोन श्रेणीतील मोबाइल्सचा विस्तार करण्यासाठी आक्रमक योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षभरात 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.


परवडणा-या किमतीतील मोबाइलमुळे कंपनीची वर्षाकाठी 80 टक्क्यांनी व्यावसायिक वृद्धी झाली आहे. चालू वर्षात 4,500 कोटींचा महसूल मिळवण्याबरोबरच 2015 पर्यंत आठ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य ठेवले असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी सांगितले. कंपनीने अँड्रॉइड किटकॅटवर आधारित तीन नवे स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत.


कंपनीच्या एकूण विक्रीत तब्बल 80 टक्के वाटा हा फ्यूचर फोन्सचा आहे, तर स्मार्टफोनलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 65 टक्क्यांपर्यंत वृद्धी होईल, पुढच्या आर्थिक वर्षात मोबाइल वितरणासाठी 300 कोटी, तर विकास आणि संशोधनासाठी 400 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले. गेल्या वर्षात स्मार्टफोन बाजारपेठेत 229 टक्क्यांनी वाढ झाली होती.


कराराने होणार फायदा :
० सेमिकंडक्टर क्षेत्रात कार्यरत असलेल्या मीडियाटेक या कंपनीबरोबर कार्बनने सहकार्य करार केला आहे. मीडियाटेकच्या उत्पादन अभियांत्रिकीचा मोठा लाभ कंपनीला या करारामुळे होणार आहे.
० या सहकार्य कराराच्या माध्यमातून कार्बनने टायटॅनियम हेक्सा, टायटॅनियम ऑक्टेन आणि टायटॅनियम ऑक्टेन प्लस ही मोबाइलची नवी श्रेणी बाजारात दाखल केली आहे. किटकॅट ओएसचा अनुभव ग्राहकांना देणारा कार्बन हा पहिला ब्रँड ठरला आहे. हे नवीन मोबाइल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.