आणखी एका स्‍वस्‍त / आणखी एका स्‍वस्‍त टॅब्‍लेटची बाजारात उडी!

बिझनेस ब्‍युरो

Apr 10,2012 03:28:00 PM IST

स्‍वस्‍तात टॅब्‍लेट देण्‍याची स्‍पर्धाच सुरू झाली आहे असे दिसते. या स्‍पर्धेमध्‍ये आता कार्बन ही भारतीय कंपनी उतरली आहे. कंपनीने आपल्‍या वेबसाईटवर या मॉडेलचे छायाचित्र अपलोड केले आहे. सात इंचाचा हा टॅब्‍लेट अँड्रायड 4.0 आईसक्रीम सँडविचवर चालणार आहे.
एचसीएल आणि मायक्रोमॅक्‍सनंतर आता कार्बनच्‍या रूपात ग्राहकांना एक नवा पर्याय उपलब्‍ध झाला आहे. सध्‍या कंपनीने याची किंमत घोषित केलेली नाही. परंतु, तज्‍ज्ञांच्‍या मते 10 हजारांच्‍या आसपास याची किंमत असेल. इतकी किंमत असूनही इतर टॅब्‍लेटमध्‍ये ज्‍या सुविधा उपलब्‍ध आहेत ते यामध्‍ये असतील. या मॉडेलची जास्‍त माहिती घेण्‍यासाठी आपल्‍याला थोडे थांबावे लागेल.

X
COMMENT