आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keshar Mango Export May Be Cut Down This Year For Drought Situation

केशर आंबा निर्यातीला यंदा बसणार दुष्काळाचा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- गतवर्षी झालेल्या अपु-या पावसाचा फटका केशर आंबा निर्यातीला बसला असून यावर्षी केवळ आठ ते 10 टन आंब्याचे निर्यात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षात आंबा निर्यात केंद्रातून 172 टन आंब्याची निर्यात परदेशात झाली आहे. केशर आंबा हा पुणे, श्रीरामपुर येथील शेतक-यांकडून जालना येथे प्रक्रियेसाठी येतो. यंदा मात्र दुष्काळाची छाया सर्वत्र असल्याने आंबा निर्यातन केंद्रातुन केशर बाहेर जाईल की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. शेतक-यांनी नोंदणी केल्यानंतर निर्यातीचे उदिष्ट ठरणार आहे.

कृषी व पणन मंडळाच्या पुढाकाराने वर्ष 1995 मध्ये तीन कोटी रुपये खर्चून आंबा निर्यात केंद्र उभारण्यात आले ले आहे. महाराष्‍ट्रात आंबा लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, योग्य मार्केटिंग अभावी शेतक-यांचा याचा म्हणावा तसा फायदा होत नव्हता. कोणत्याही प्रकारची वर्गवारी न केल्यामुळे एक - सारख्या भावात आंब्याची विक्री केल्या जात होती. यावर आंबा निर्यात केंद्र हा प्रभावी उपाय ठरला. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्‍ट्र, पुणे, अहमदनगर, नांदेड येथील शेतक-यांनासुद्धा याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. महाराष्‍ट्रात हापुस हा सर्वात लोकप्रिय अंबा म्हणून ओळखला जातो. याला स्थानिक बाजारपेठेसह विदेशातही मोठी मागणी आहे. आंबा निर्यात केंद्र सुरू झाल्यामुळे आंबा उत्पादक शेतक-यांना देश-परदेशात आंबा विक्रीची सुविधा उपलब्ध झाली.

आवक घटतेय
आंबा निर्यात केंद्रातील निर्यातीबाबतचा विचार करता, दिवसेंदिवस आवक कमी होत चालली आहे. जालना जिल्ह्यातील घनसांवगी वगळता अन्य ठिकाणी म्हणावे तसे उत्पादन होत नाही. पावसाचे अत्यल्प प्रमाण, अपु-या सिंचनसुविधांमुळे उत्पादनात घट होत चालली आहे. यंदाची भिस्त ही पुणे व नगर जिल्ह्यावर अवलंबून असणार आहे.