आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto Expo: ऑटो एक्स्पोचे नवे आकर्षण: किड्स कॉर्नर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 फेब्रुवारीपर्यंत चालणारा ऑटो एक्स्पो शुक्रवारी प्रथमच सामान्य लोकांसाठी खुला झाला आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच लांब रांगा लागल्या. या प्रदर्शनात 70 प्रकारची नवी वाहने आहेत. मात्र या वाहनांच्या मेळ्यात भारतीय मोटारसायकलचा एकही स्टॉल नसल्याने वाहनप्रेमी थोडे निराश आहेत. पहिल्या दिवशी मारुती गर्दीचे आकर्षण ठरली. इतर कंपन्यांनी यंदा उत्कृष्ट दर्जाची वाहने सादर केली आहेत.
सर्वाधिक सुरक्षित, वेगवान आणि महाग
प्रोजेक्ट-7 ही कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेली सर्वाधिक वेगवान कार आहे. एफ टाइप सिंगल सीटर व्ही-8 कारमध्ये 5.0 लिटरचे इंजीन आहे. 8-स्पीड ट्रान्समिशनसह ही कार 4.2 सेकंदातच ताशी 100 किलोमीटर वेग धारण करते.
सर्वात सुरक्षित एम-गॉर्ड मर्सिडीझ बेंझची एम-गॉर्ड ही एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या कारमध्ये सर्वाधिक सुरक्षित कार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुलेटप्रूफ 44 मेग्नम बुलेटचा या वाहनावर काहीही परिणाम होत नाही. तसेच हातबॉम्बचाही या गाडीवर काहीही परिणाम होत नाही. भारतीय बाजारात या गाडीची किंमत 2.49 कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. एखाद्या ग्राहकाने मागणी केल्यानंतर त्याच ग्राहकासाठी ही खास गाडी तयार करण्यात येईल.
सर्वात महागडी रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी ब्लॅक एडिशन: ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या वाहनांमध्ये सर्वात महागडी गाडी रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी ब्लॅक एडिशन आहे. या गाडीची किंमत 3.75 कोटी रुपये (एक्स -शोरूम, मुंबई) एवढी आहे. भारतात ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फोर्ड टी - मॉडेल: एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेली 1917 चे फोर्ड टी-मॉडेल सर्वात जुने आहे.