आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kingfisher Pilots Strike Work On March Salary Dues

थकित पगारासाठी 'किंगफिशर'चे वैमानिक पुन्‍हा संपावर, 7 उड्डाणे रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- किंगफिशर एअरलाईन्‍सच्‍या अडचणींमध्‍ये आणखी भर पडली आहे. काही वैमानिकांनी अचानक संप पुकारल्याने किंगफिशरच्‍या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईवरुन 7 उड्डाणे रद्द करण्‍यात आली आहेत. पगाराची थकबाकी त्‍वरीत देण्‍यात यावी, अशी मागणी संपावर गेलेल्‍या वैमानिकांनी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 15 वैमानिक कंपनीचे सीईओ संजय अग्रवाल यांना भेटण्‍यासाठी गेले होते. ही बैठक निष्‍फळ ठरली. वैमानिकांना मार्च महिन्‍याचे वेतन मिळालेले नाही. व्‍यवस्‍थापनाने त्‍यांना 17 ऑगस्‍टपर्यंत थकित वेतन देण्‍यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. परंतु, ते पूर्ण न झाल्‍याने वैमानिक संपावर गेले. कंपनीचे अध्‍यक्ष विजय माल्‍या यांच्‍याकडून मंगळवारपर्यंत वेतन देण्‍यात येईल, असे आश्‍वासन देण्‍यात आले होते. परंतु, त्‍यांनी यापूर्वी अनेक वेळा दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत, असे सांगून वैमानिक संपावर गेले.
या महिन्यात एअरलाईन्सच्या वैमानिकांनी दोनदा संप पुकारला आहे. किंगफिशरची खाती गोठविण्‍यात आल्‍यानंतर मार्च महिन्‍यापासून अनेक कर्मचा-यांना पगार मिळालेला नाही.