आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात 11 नवे मॉडेल्स लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: फॉक्सवॅगन वेंटो फेसलिफ्ट )
या महिन्यात लाँच होणा-या कार मॉडेल्सची वैशिष्ट्ये आणि लवकरच येणा-या बेनेलीच्या स्पोर्ट‌स बाइकविषयी जाणून घ्या...
मर्सिडीझ बेंझ जीएलए-क्लास
वैशिष्ट्य : ही मर्सिडीझची नवी कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही कार आहे.
प्रमुख आकर्षण : कारचे मॉडेल सुंदर आहे. ड्राइव्ह आरामदायी आहे. मात्र, फक्त २ डब्ल्यूडी ऑप्शन सध्या उपलब्ध आहे. किंमत : ३२.७५-३६.९ लाख
स्पर्धा : बीएमडब्ल्यू एक्स १ व ऑडी क्यू ३

निस्सान टेरेनो अ‍ॅनेव्हर्सरी
वैशिष्ट्य : कारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मर्यादित मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत.
प्रमुख आकर्षण : कारचे छत काळ्या रंगाचे आहे. विंग मिरर आहे. बोनटवर २ गो-फास्टर स्ट्राइप्स आहेत. किंमत : एक्सव्हीडी : १२.८३ लाख, प्रीमियम : १३.३ लाख
स्पर्धा : रेनो डस्टर

फॉक्सवॅगन वेंटो फेसलिफ्ट
वैशिष्ट्ये : फॉक्सवॅगन मिड-साइजरची पहिली फेसलिफ्ट कार.
प्रमुख आकर्षण : कारचे इंटेरिअर व एक्स्टेरिअर क्लासिक आहे. यात संपूर्ण नव्या बनावटीचे डिझेल इंजिन आहे.
किंमत : पेट्रोल - ७.४४ ते ९.९२ लाख, डिझेल : ८.५७ ते १०.९४ लाख
स्पर्धा : होंडा सिटी व ह्युंदाई व्हर्ना

टोयोटा इटिऑस, इटिऑस लिव्हा फेसलिफ्ट
वैशिष्ट्य: इटिऑस फेसलिफ्ट मॉडेलमध्ये काही आधुनिक बदल करण्यात आले आहेत.
प्रमुख आकर्षण : स्टँडर्ड ट्रिममध्ये नवे ग्रील व ड्यूएल फ्रंट एअरबॅग्ज आहेत. टॉप ट्रिममध्ये रिअर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रिक मिरर आहेत. किंमत : इटिऑस : ५.७४ -८.१६ लाख, इटिऑस लिव्हा : ४.७६-६.९५ लाख स्पर्धा : होंडा अमेझ, ह्युंदाई आय २०

शेवरोले सेल, सेल यू-व्हीए फेसलिफ्ट
वैशिष्ट्य : सेलचे हे अपडेटेड मॉडेल आहे. इंटेरिअर आकर्षक आहे.
प्रमुख आकर्षण : लक्षवेधी डॅशबोर्ड, दर्जेदार साधनांचा वापर करण्यात आलाय.
किंमत : सेल यू व्हीए : ४.४१-७.५७ लाख, सेल : ५.१९ -८.६१ लाख स्पर्धा : होंडा अमेझ, मारुती स्विफ्ट

पुढे वाचा मारुतीचे सिआज मॉडेलविषयी..
मारुतीचे सिआज मॉडेल
वैशिष्ट्य: मारुतीची नवी मध्यम आकाराची सेडान कार आहे.
प्रमुख आकर्षण : क्लास लिडिंग स्पेस व इंधन बचत करणारे मॉडेल. यातील उपकरणे दर्जेदार आहेत.
किंमत : पेट्रोल-६.९९ ते ९.३४ लाख, डिझेल-८.०४ ते ९.०८ लाख (एक्स शोरूम, दिल्ली)
स्पर्धा : होंडा सिटी, फॉक्सवॅगन वेंटो, स्कोडा.

महिंद्राची स्कॉर्पिओ कार
वैशिष्ट्य: ही सेकंड जनरेशन कार आहे. प्रमुख आकर्षण : कारचे चेसिस नवे आहे. मॅन्युअल बॉक्सही नवा आहे. सस्पेन्शनमध्ये बदल आहे. स्टिअरिंग, नवे इंटेरिअर , एक्स्टेरिअर ही प्रमुख आकर्षणे आहेत. किंमत : ~७.९८ ते ११.४६ लाख(एक्स शोरूम नवी दिल्ली)