आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About India\'s Most Wanted Don Dawood Ibrahim Kaskar Assets And Luxury

प्रत्‍येक मिनिटाला दाऊद कमावतो 2 कोटी, 35 बंगले आणि 900 कार्सचा आहे मालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा पहिला आणि जगातील तिसरा सर्वांत मोस्‍ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहिम कासकरबद्दल नुकतीच पाकिस्‍तान सरकारने सफाई दिली आहे. पाकिस्‍तान दरवेळेस दाऊद आमच्‍या देशात नसल्‍याचा दावा करीत असतो. परंतु, त्‍यांच्‍याच एका राजकीय अधिका-याने बोलता बोलता तो पाकिस्‍तानातच होता, असे म्‍हटले होते. त्‍यांच्‍या या विधानामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज आम्‍ही तुम्‍हाला याच दाऊद इब्राहिमच्‍या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. या संपत्तीच्‍या जोरावरच तो जगभर फिरतोय, आणि ऐषोआरामी आयुष्‍य जगत आहे.
दाऊदच्‍या डी कंपनीचा व्‍यवसाय संपूर्ण जगात पसरलेला आहे. कोट्यवधी रूपयांच्‍या संपत्तीचा मालक असलेल्‍या दाऊदचे भारतासहित जगभरात सुमारे 35 घरे आहेत. मुंबईमध्‍येही दाऊदचे घर असून तिथे त्‍याचा भाऊ आणि बहिण राहते.
गुप्‍तचर खात्‍याकडून मिळालेल्‍या माहितीनुसार भारताच्‍या या मोस्‍ट वॉंटेडकडे सुमारे 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्‍त संपत्ती असून ती टाटा-अंबानीसारख्‍या दिग्‍गजांपेक्षा अनेकपटींनी जास्‍त आहे.
आता तुम्‍ही विचार करीत असाल की दाऊदकडे इतका पैसा कुठून आला आणि या पैशानी तो कशी मजा करीत असेल. कुठे ठेवत असेल हा पैसा... त्‍याचे घर कसे असेल. कशा पद्धतीने तो जगत असेल आणि त्‍याचा व्‍यवसाय तो कशापद्धतीने सांभाळत असेल. प्रत्‍येक मिनिटाला 2 कोटी रूपये तो कसा कमावतो.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या दाऊदच्‍या संपत्ती‍ आणि त्‍याच्‍या ऐषोआरामी आयुष्‍याविषयी...