आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकाम्‍या हाताने घरातून निघाला आणि उभे केले 1.42 लाख कोटींचे साम्राज्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी फोर्ब्‍स मॅगझीनने जगातील श्रीमंतांची यादी जाहीर केली होती. फोर्ब्‍सने त्‍यांच्‍या यादीत 20 अब्‍ज डॉलर संपत्तीचा मालक असलेल्‍या एका व्‍यक्‍तीला 26 व्‍या स्‍थानी ठेवले होते. यावर नाराज झालेल्‍या या व्‍यक्‍तीने ब्रिटनच्‍या कोर्टात फोर्ब्‍स मॅगझीनवर आपली संपत्ती कमी दाखवून आपली मानहानी केल्‍याचा खटला दाखल केला. मॅगझीनने त्‍यांच्‍याकडे 20 अब्‍ज डॉलर (सुमारे 1.14 लाख कोटी रूपये) दाखवून त्‍यांना 26व्‍या स्‍थानी ठेवले होते. मात्र, त्‍या व्‍यक्‍तीचा दावा आपल्‍याकडे 9.6 अब्‍ज डॉलर (सुमारे 54.77 हजार कोटी रूपये) असल्‍याचा होता. माझ्याकडे एवढी कमी संपत्ती नाही की श्रीमंतांच्‍या यादीत आपला क्रमांक खाली राहील असे, त्‍याने म्‍हटले. या अफलातून व्‍यक्‍तीचे नाव आहे राजकुमार तलाल.

सौदी अरबचे राजकुमार अलवलीद बिन तलाल बिन अलसद अरब देशातील सर्वात धनिक व्‍यक्‍तीमत्‍व आहे. राजकुमार अल वलीद बिन तलालचा जन्‍म सौदी अरबच्‍या राजघराण्‍यात 7 मार्च 1957 रोजी झाला होता. अलवलीदने रियाध ये‍थील मिलिट्री स्‍कूलमध्‍ये प्रवेश घेतला होता. तिथे त्‍यांना कडक शिस्‍तीचे धडे मिळाले. अल सद यांचे मुख्‍य उत्‍पन्‍न हे बँकिंग, फायनान्‍स आणि इन्‍व्‍हेस्‍टमेंट क्षेत्रातून मिळते. त्‍यांची कंपनी किंगडम होल्डिंग जेद्दा येथे जगातील सर्वात उंच इमारत बनवण्‍याच्‍या तयारीत आहे.

divyamarathi.comवर अरब देशातील सर्वात धनिक आणि शक्‍तीशाली व्‍यक्‍तीच्‍या या यशापर्यंत पोहोचण्‍याच्‍या प्रवासाच्‍या रोचक गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...