आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About The Whatsapp And The Revenue Model Of This

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या \'WHATS APP\'च्या यशाचे गमक; जाणून घ्या कशी होते कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवधीत तरूणांमध्ये लोकप्रियता झालेले 'व्हॉट्स अ‍ॅप' हे मोबाइल मॅसेजिंग स्टार्ट अॅप्लिकेशन आता सोशल मीडियात दबदबा असणार्‍या 'फेसबुक'च्या मालकीचे झाले आहे. 'फेसबुक'ने 'व्हॉट्स अ‍ॅप'ला 19 बिलियन डॉलर्सला (भारतीय मुल्यांत 1182 अब्ज रूपये) खरेदी केले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही आतापर्यंतची सगळ्यात मोटी 'डील' ठरली आहे. 'व्हॉट्स अ‍ॅप'चे जगभरात 450 दशलक्ष युजर्स आहेत.

ब्रियान अॅक्टन (Brian Acton) आणि जॅन कॉम (Jan Koum) या दोघांनी 'व्हॉट्स अॅप'ची निर्मिती केली होती. मात्र अल्पावधीत 'व्हॉट्‍स अॅप' जगातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले आहे. 2013 मधील आकडेवारीनुसार, 'व्हॉट्स अॅप'च्या माध्यमातून दिवसाला 20 अब्जांपेत्रा जास्त मेसेज पाठविले जातात. आता तर ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोनची संख्येत दररोज वाढते आहे. भारत सारख्या देशात हाय स्पीड इंटरनेट न वापरु शकणार्‍यांसाठी तर 'व्हॉट्स अॅप'ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. 'व्हॉट्‍स अॅप'च्या माध्यमातून युजर्स मेसेजच नाही तर फोटो, व्हिडिओ आणि साउंड फाइलही पाठवत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, 'व्हॉट्‍स अॅप'सह ब्रियान अॅक्टन आणि जॅन कॉम यांच्या यशाचे गमक.