आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Who Fell Into Coma After Breast Augmentation Surgery

\'ब्रेस्ट सर्जरी\' उठली जिवावर; ‍जिवंतपणी नरक यातना भोगतेय लिंडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी- 'ब्रेस्ट ऑग्मेन्टेशन सर्जरी'चे दुष्परिणाम लिंडा पेरेज हिच्याशिवाय दुसरं कोणीच समजू शकत नाही. मियामीची रहिवासी असलेली 19 वर्षीय लिंडाने ऑगस्ट 2013 मध्ये 'ब्रेस्ट' आकर्षक दिसावी, यासाठी लिंडाने 'आग्मेन्टेशन सर्जरी' केली. परंतु त्यानंतर काही तासांनंतर ती कोमात गेली. आता लिंडा कोमातून बाहेर आली असली तरी ती कोणाचा साहारा घेतल्याशिवाय चालू शकत नाही. एवढेच नाही तर ती बोलू शकत नाही. अक्षरश: लिंडा जिवंतपणी नरक यातना भोगते आहे.

लिंडाचे आता बरे होणे कठीण असल्याचे तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगून टाकले आहे. परंतु तरीसुद्धा लिंडा पुन्हा आधीप्रमाणे चालू शकेल, बोलू शकेल असा विश्वास तिच्या आईने व्यक्त केला आहे.

'मियामी हेराल्ड'शी बोलताना लिंडाची आई मरिला डिजाय म्हणाली, 'लिंडा डिप्रेशनमध्ये वावरते आहे. ती सारखी रडत असते. परंतु ती आधी सारखी चालेल, बोलेल.'

दरम्यान, लिंडाने वयाच्या 18 वर्षी 'ब्रेस्ट एनलार्ज सर्जरी' करवून घेतली होती. सर्जरी समाप्त झाल्यानंतर एक तास होत नाही तोवर लिंडाच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. त्यानंतर ती कोमात गेली. तब्बल दोन महिन्यांनंतर ती कोमातून बाहेर आली. लिंडाची सर्जरी करणार्‍या डॉक्टरांच्या मते तिने सर्जरी करण्यापूर्वी काही गोष्टी लपवून ठेवल्यामुळे या सर्जरीचा तिच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आहे. लिंडावर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करणार्‍या डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.