आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लीटरमध्ये 37.5 किमीचे मायलेज देणारी स्कोडाची \'ओक्टेविया\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो इंडस्ट्रीमध्ये सध्या गर्दी दिसत असली ऑटो सेल्सचे आकडे धक्कादायक आहेत. पेट्रोलचे दर सतत वाढत असल्याने डिझेल वाहनाची मागणी वाढत आहे. मात्र, डिझेल वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही दिसत नाही. डिसेंबर महिन्यातील बहुतेक वाहन निर्मात्या कंपन्यांचे ऑटो सेल्सचे आकडे फारच भयानक आहेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये बिकट परिस्थिती असताना 'ओक्टेविया'चे 'ग्रीनलाइन' व्हर्जन एक लीटरमध्ये 37.5 किलोमीटर मायलेज देत असल्याचा दावा 'स्कोडा' कंपनीने केला आहे.
'ओक्टेविया' ही कार डिझेलवर धावते. विशेष म्हणजे ही कार प्रति लीटर 37.5 किलोमीटर मायलेज देत असल्याची सध्या जोरदार मार्केटिंग सुरु आहे. स्कोडाने गेल्या वर्षी 'ओक्टेविया'चे 'ग्रीनलाइन' व्हर्जन ब्रिटनमध्ये सादर केले. शानदार मायलेजाशिवाय या डिझेल पॉवर्ड कारचे कार्बन अॅमिशन फक्त 85 ग्रॅम प्रति किलोमीटर आहे. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2 लीटर टर्बो डिझेल इंजीनच्या बदल्यात 1.6 लीटर टीडीआय टर्बो इंजीनचा वापर करण्यात आला आहे.
स्कोडा 'रॅपिड' आणि फॉक्सवॅगन 'वेंटो'मध्ये यापूर्वी हे इंजीन वापरण्यात आले आहे. 'ओक्टेविया' ग्रीनलाइन व्हर्जनमध्ये बसवण्यात आलेले इंजीन 110 पीएसची ऊर्जा आणि 250 एनएम टॉर्क निर्माण देते. दुसरी महत्त्वाची गोष्‍ट म्हणजे सर्वाधिक मायलेज देणार्‍या या कारमध्ये आयडल स्टॉप सिस्टिम बसवण्यात आली आहे. या सिस्टिममुळे ट्रॉफिक सिग्नलवर अथवा अन्य ठिकाणी कार थांबविल्यानंतर इंजीन बंद करते.
पुढे वाचा, ल स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, एक लीटर डिझेलमध्ये 37.5 किमीचे मायलेज देणार्‍या कारबाबत...