आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know About Wadia Group And Family News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचे संस्थापक जिना यांचे पणतू आहेत नेस वाडिया, जाणून घ्या फॅमिली ट्रीबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोच्या वरच्या भागात नेस आणि नुस्ली वाडिया आणि खाली फॅमिली ट्री)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नेस वाडियावर आरोप करण्यात आले आहेत. नेसचे वडील नुस्ली यांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचे जाहीर झाल्यावर या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले. वाडिया ग्रुप एक प्रतिष्ठित बिजनेस ग्रुप राहिला आहे. पहिल्यांदाच या ग्रुपचे नाव एखाद्या वादात सापडले आहे.
जाणून घ्या वाडिया ग्रुपच्या फॅमिली ट्रीबद्दल
- नेस वाडिया यांच्या कुटुंबाचा संबंध पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांच्याशी आहे. नेसचे वडील नुस्ली जिना यांचे नातू आहेत. यामुळे नेस जिना यांचे पणतू लागतात.
- महंदम अली जिना एकूण सात भावंडे होते. जिना यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव एमीबाई जिना होते. परंतु, त्यांच्यासोबत जिना जास्त काळ राहू शकले नाहीत.
-त्यानंतर जिना यांनी मरियम यांच्यासोबत लग्न केले. पहिल्या लग्नातून जिना यांना कोणतेही अपत्य नव्हते. लग्नानंतर मरियम यांनी एक मुलीला जन्म दिला. तिचे नाव डिना होते.
- डिनाचे लग्न निवेली वाडिया यांच्यासोबत झाले. हे दोघे नुस्ली वाडिया यांचे पालक आहेत. नुस्ली वाडिया यांचे लग्न मॉरिन वाडिया यांच्यासोबत झाले. त्यांना नेस आणि जहांगिर असे दोन मुलगे झाले. नेस नुस्ली यांचा मोठा मुलगा आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, वाडिया कुटुंबियांबद्दल, त्यांच्या कंपन्या आणि गुंतवणूक...