आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोडॅक कॅमेरा कंपनीला घरघर; 19 हजार कर्मचारी घरी बसणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क: फोटोग्राफी क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन कोडॅक कॅमेरा कंपनीला घरघर लागली आहे. दिवाळं निघाले असे जाहीर करण्यासाठी कोडॅक कंपनीने गुरुवारी अर्ज केला आहे. त्यामुळे कंपनीच्या 19 हजार कर्मचार्‍यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे.
कोडॅक कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे कंपनीने काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ईस्टमन कोडॅकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एंटोनियो पेरेज यांनी सां‍गितले.
1980 मध्ये कोडॅक कॅमेरा कंपनीचे नाव होते. तेव्हा या कंपनीत एक लाख 45 हजार कर्मचारी कार्यरत होते. चंद्राचे पहिले छायाचित्र काढण्याच्या कामात कोडॅक कंपनीचे मोठे योगदान होते.