आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kokuyo Camlin To Set Up Rs100 Crore Factory In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकुयो कॅम्लिनचा पाताळगंगेत अत्याधुनिक स्टेशनरी प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लेखन सामग्रीच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या कोकुयो कॅम्लिन या कंपनीने आता विस्तारीकरण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग राज्यातल्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये कंपनी एक अत्याधुनिक प्रकल्प उभारत आहे. चौदा एकरपेक्षा जास्त जागेवर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प कोकुयोच्या जगभरातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असेल. यासाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता आर. व्ही. सोंजे, एमआयडीसीचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, कोकुयो कॅम्लिन लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकुयो एस अँड टी या विदेशातील कंपनीने ऑक्टोबर २०११ मध्ये कॅम्लिन लिमिटेडचा बहुतांश भाग अधिग्रहण केला हाेता. हा नवीन प्रकल्प दोन वर्षात कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासामध्ये आठ दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या दांडेकर परिवाराच्या कामगिरीचा उल्लेख करतानाच मोठ्या प्रकल्पासाठी पाताळगंगाची निवड केल्याबद्दल कोकुयोचे अभिनंदन केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
आधुनिक रचना, स्थिर उत्पादनाच्या माध्यमातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न, पर्यावरणानुकूल प्रकल्प, आधुनिक गोदाम सुविधा, सौरऊर्जा व पाणी संवर्धन प्रणाली.