आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Korning Technology Invest Six Hundered Crore In Chakan Plant

कोर्निंग टेक्‍नॉलॉजीची चाकणमध्‍ये सहाशे कोटींची गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काचेची उत्पादने बनविणारी जगातील नामांकित कंपनी कोर्निंग टेक्नॉलॉजी पुण्याजवळ चाकण येथे ५८८ कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारणार असून त्यासाठी एमआयडीसीने २६ एकर जागा देऊ केली आहे. राज्य सरकारच्या उद्योग खात्यातर्फे ही माहिती देण्यात आली. कंपनीतर्फे चाकण प्रकल्पात ऑप्टीकल केबल बनविली जाणार आहे.

या नव्या प्रकल्पामुळे सुमारे २७० लोकांना रोजगार मिळणार आहे. कोर्निंग टेक्नॉलॉजी इंडियातर्फे ही गुंतवणूक केली जाणार आहे. राज्य सरकारने गुंतवणुकीसाठी पाच वर्षाची मुदत दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि कंपनीत सामंजस्य करार केला जाणार आहे. त्यानुसार मेगा प्रकल्प दर्जा दिला जाणार आहे.